IMPIMP

Pune Police Inspector Suspended | पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर; 2 दिवसांत 5 अधिकार्‍यांसह 10 पोलिस निलंबीत

by nagesh
Pune Police Inspector Suspended | Pune Police Commissioner Ritesh Kumar on Action Mode; 10 cops suspended including 5 officers in 2 days

पुणे (नितीन पाटील) : Pune Police Inspector Suspended | पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) हे अ‍ॅक्शन मोडवर असून त्यांनी 2 दिवसांमध्ये कर्तव्यात हजगर्जीपणा तसेच जबाबदारी पार न पाडणार्‍या 10 पोलिसांना निलंबीत केले आहेत. त्यामध्ये 2 पोलिस निरीक्षकासह एका सहाय्यक पोलिस निरीक्षक Assistant Police Inspector (API), 2 पोलिस उपनिरीक्षक Police Sub Inspector (PSI) आणि 5 पोलिस अंमलदारांचा (Pune Police Personnel) समावेश आहे. (Pune Police Inspector Suspended)

सहकारनगर पोलिस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या 4 अदखलपात्र गुन्हे व्यवस्थितरित्या न हाताळल्यामुळे पोलिस स्टेशनच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांना निलंबीत केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर Sr PI Savalaram Salgaonkar (तत्कालीन नेमणुक सहकारनगर पोलिस स्टेशन. सध्या नेमणुक – नियंत्रणक कक्ष), पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोज एकनाथ शेंडगे (PI Manoj Eknath Shendge), सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे (API Sameer Vitthal Shende), पोलिस उपनिरीक्षक हसन मकबुल मुलाणी (PSI Hassan Maqbool Mulani), पोलिस उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे (Maruti Govind Waghmare), पोलिस हवालदार संदीप जयराम पोटकुले (Police Sandeep Jairam Potkule)आणि पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे (Vinayak Dattatraya Jambhale) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police Inspector Suspended)

विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या (Vishrambaug Police Station) हद्दीतील सदाशिव पेठेत पेरूगेट पोलिस चौकीपासून (Perugate Police Chowki) हाकेच्या अंतरावर तरूणीवर तरूणाने कोयत्याने हल्ला (Attack On Girl In Sadashiv Peth Pune) केला होता. त्यावेळी पोलिस चौकीत नियुक्तीस असलेले 3 पोलिस अंमलदार हे पोलिस चौकीत हजर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिस हवालदार सुनिल शांताराम ताठे (Police Sunil Shantaram Tathe), पोलिस अंमलदार प्रशांत प्रकाश जगदाळे (Police Prashant Prakash Jagdale) आणि सागर नामदेव राणे (Police Sagar Namdev Rane) अशी निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कर्तव्यात कसूर करणार्‍या तसेच जबाबदारी पार न पाडणार्‍यांवर आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे एका प्रकारे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : Pune Police Inspector Suspended | Pune Police Commissioner Ritesh Kumar on Action Mode; 10 cops suspended including 5 officers in 2 days

Related Posts