IMPIMP

Pune Police Sr PI, PI, API, 2 PSI, 2 Havaldar Suspended | पुणे पोलिसांच्या इतिहासातील निलंबनाबाबतची पहिलीच मोठी कारवाई ! CP रितेश कुमार यांचा रूद्रावतार; वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोनि (गुन्हे), एपीआय, 2 पीएसआयसह 7 जण तडकाफडकी निलंबीत

सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना कर्तव्य गांभीर्याने व जबाबदारीने पार पाडले नसल्याने कारवाई

by nagesh
Pune Police Sr PI, PI, API, 2 PSI, 2 Havaldar Suspended | CP Ritesh Kumar Suspended 7 Police Officer Including Ex Sr PI Of Sahakar Nagar Police Station

पुणे (नितीन पाटील) : Pune Police Sr PI, PI, API, 2 PSI, 2 Havaldar Suspended | पुणे शहर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलिस निरीक्षक, 2 पोलिस उपनिरीक्षक आणि 2 पोलिस हवालदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी रूद्रावतार धारण केला असून कर्तव्य गांभीर्याने व जबाबदारीने पार पाडले नसल्याने संबंधित पोलिस अधिकारी व पोलिस हवालदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यापार्श्वभुमीवर पोलिस आयुक्तांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. (Pune Police Sr PI, PI, API, 2 PSI, 2 Havaldar Suspended)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर Sr PI Savalaram Salgaonkar (तत्कालीन नेमणुक सहकारनगर पोलिस स्टेशन. सध्या नेमणुक – नियंत्रणक कक्ष), पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोज एकनाथ शेंडगे (PI Manoj Eknath Shendge), सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे (API Sameer Vitthal Shende), पोलिस उपनिरीक्षक हसन मकबुल मुलाणी (PSI Hassan Maqbool Mulani), पोलिस उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे (Maruti Govind Waghmare), पोलिस हवालदार संदीप जयराम पोटकुले (Police Sandeep Jairam Potkule)आणि पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे (Vinayak Dattatraya Jambhale) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police Sr PI, PI, API, 2 PSI, 2 Havaldar Suspended)

सहकारनगर पोलिस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीतमध्ये 2 वेळा तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या तर एकाने मध्यरात्री भररस्त्यात तलवारीने केक कापला होता. दरम्यान, पोलिस हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे हे दोघे सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल अंमलदार म्हणुन कार्यरत असताना त्यांनी एकुण 4 अदखलपात्र गुन्हयांची तक्रार गांभीर्याने न घेतल्यामुळे सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या दाखल गुन्हयांच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांना दिले होते. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सदरील प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून पोलिस आयुक्तांना अहवाल सादर केला.

चौकशी अहवालानुसार निलंबीत करण्यात आलेल्यांपैकी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी/गुन्हे, पर्यवेक्षीय अधिकारी म्हणुन कार्यरत असताना 4 अदखलपात्र गुन्हयातील आरोपी / फिर्यादी यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई व प्रभावी प्रतिबंधक कारवाई न केल्यामुळे, तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे संबंधि पोलिस अधिकारी व पोलिस हवालदार यांच्याकडून कर्तव्य/कारवाई करून घेण्याचे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली.

तपास पथकाचे प्रमुख डी.बी. अधिकारी म्हणुन कार्यरत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर शेंडे यांनी देखील 4 अदखलपात्र गुन्हयातील सराईत आरोपी / फिर्यादी व गुन्हेगार चेक न करणे त्यांचे हलचालीबाबत गोपीनय माहिती प्राप्त न करणे, तक्रार गांभीर्याने न घेणे, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक न ठेवणे अशी हलगर्जी केली.

पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी व पोलिस उपनिरीक्षक मारूती वाघमारे यांनी देखील सर्व्हेलंस पथक प्रमुख प्रतिबंधक कारवाई अधिकारी व घटनास्थळांचे चौकशी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना हजगर्जीपणा केला. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.

पुणे पोलिसांच्या इतिहासात एवढया मोठया प्रमाणावर निलंबनाची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, यापुर्वी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी नोट बंदीच्या काळात बातमीदार नितीन पाटील यांच्या वृत्ताची दखल घेवून कोथरूड पोलिस ठाण्यातील (Kothrud Police Station) पोलिस उपनिरीक्षकासह 6 जणांना बडतर्फ (6 Police Dismissed) केले होते. त्यानंतर पासुन एकाच वेळी एवढया मोठया प्रमाणावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title : Pune Police Sr PI, PI, API, 2 PSI, 2 Havaldar Suspended | CP Ritesh Kumar Suspended 7 Police Officer Including Ex Sr PI Of Sahakar Nagar Police Station

Related Posts