IMPIMP

Pune Police News | पुण्यात पोलीस अंमलदाराकडून सिनेस्टाईल पाठलाग ! ऊसाच्या शेतात पळून गेलेला गुन्हेगार ताब्यात; गावकऱ्यांकडून पोलिसांचा सत्कार

by nagesh
Pune Police News | Cinestyle chase by the Hadapsar police officer in Pune! Escaped criminal in sugarcane field captured; The police are felicitated by the villagers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | मिठाईच्या दुकानातील सर्व काचेची कपाटे, फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड करुन दुचाकीवरुन पळून जाणाऱ्या तीन आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. हा थरार रविवारी (दि.25) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास शेवाळवाडी येथे घडला. (Pune Police News) ड्युटीवर नसताना देखील आरोपींचा पाठलाग करुन एकाला ताब्यात घेणाऱ्या पोलीस अंमलदार विजयकुमार ढाकणे (Police Vijay Kumar Dhakne) यांचा मांजरी आणि शेवाळवाडी येथील पोलीस पाटील आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी (दि.29) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) येऊन सत्कार केला.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior PI Arvind Gokule) यांनी सांगितले, पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणे यांची रविवारी नाईट ड्युटी होती. ढाकणे हे पावणे सातच्या सुमारास त्यांच्या कुटुंबासह कामानिमित्त शेवाळवाडी चौकात आले होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी शेवाळवाडी चौकातील चैतन्य स्वीट अँड सेंटर या मिठाईच्या दुकानातील सर्व काचेची कपाटे, फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड करुन दुचाकीवरुन पळून जाताना ढाकणे यांना दिसले.

 

ढाकणे यांनी घटनेची तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती देऊन एकट्याने आरोपींचा पाठलाग सुरु केला. पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक डगळे (PI Dagle) तसेच तपास पथकाचे (Investigation Team) पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विजयकुमार ढाकणे यांनी 6 किलो मिटर आरोपींचा पाठलाग केला. दरम्यान आरोपींची दुचाकी घसरल्याने ते पडले आणि जवळच्या ऊसाच्या शेतात पळून गेले.

दरम्यान, पोलिसांना पोलीस शिपाई ढाकणे यांचे लोकेशन पाठवून ऊसात लपलेल्या विधिसंघर्षीत मुलाला (वय-17) तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच 12 पीयू 6265) ताब्यात घेतली. तर दुसरा अल्पवयीन आरोपी आणि गौरव संतोष अडसूळ (वय -19 रा. कॉलनी नंबर 5 मोरे सोसायटीच्या समोर शेवाळवाडी) हा पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 392, 427 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणे यांनी ड्युटीवर नसताना देखील केलेल्या कामगिरीची दखल घेत मांजरी आणि शेवाळवाडी या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व्यापारी यांनी गुरुवारी (दि. 29) हडपसर पोलीस ठाण्यात येऊन विजयकुमार ढाकणे यांचा सत्कार केला. तसेच पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या टीमवर्कचे कौतुक केले.

Web Title : Pune Police News | Cinestyle chase by the Hadapsar police officer in Pune! Escaped criminal in sugarcane field captured; The police are felicitated by the villagers

Related Posts