IMPIMP

Pune Police Marathon | पुनित बालन ग्रुप व पंचशील ग्रुपच्या सहकार्याने पुणे पोलिसांकडून मॅरेथॉनचे आयोजन

रन फॉर डि-अ‍ॅडिक्शन अँड रन फॉर वुमन सेफ्टी मॅरेथॉनमध्ये पुणेकर पोलिसांसोबत धावणार

by nagesh
Pune Police Marathon | Marathon organized by Pune Police in collaboration with Punit Balan Group and Panchsheel Group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Marathon | शासनाच्या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ डि-अ‍ॅडिक्शन (Drug De-addiction) व वुमन सेफ्टी (Women Safety) च्या अनुषंगाने समाजात जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांकडून मॅरेथॉनचे (Pune Police Marathon) आयोजन करण्यात आले आहे. पुनीत बालन ग्रुप (Puneet Balan Group) व पंचशील ग्रुप (Panchsheel Group) यांच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मॅरेथॉनचे आयोजन (Pune Police Marathon) करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग (Addl CP) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलाच्या वतीने पुणे पोलीस व नागरिकांकरीता ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लब, पुणे (Blue Brigade Running Club) यांच्याकडून 6 ऑगस्ट 2023 रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

10 किलोमीटरची ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडे पाच वाजता वेस्टीन हॉटेल, एबीसी रोड कोरेगाव पार्क (Westin Hotel, Koregaon Park) येथून सुरु होऊन हडपसर मगरपट्टा सिटी (Hadapsar Magarpatta City) येथून पुन्हा वेस्टील हॉटेल येथे येऊन समाप्त होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी https://www.townscript.com/e/pune-police-run-10k-243042 या लिंकवरून नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणी मोफत असून सहभागी स्पर्धकाला मोफत टी-शर्ट, मेडेल, नाष्टा दिला जाणार आहे.

रन फॉर डि-अॅडिक्शन अँड रन फॉर वुमन सेफ्टी मॅरेथॉनमध्ये पोलीस व
नागरिक असे एकूण 700 स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
त्यामुळे ज्या स्पर्धकांना यामध्ये भाग घ्यायचा आहे. अशांनी तात्काळ नाव नोंदणी करावी.
सुरक्षित पुणे व तंदरुस्त पुणेकरांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Web Title :  Pune Police Marathon | Marathon organized by Pune Police in collaboration with Punit Balan Group and Panchsheel Group


हे देखील वाचा

Related Posts