IMPIMP

Pune Police MCOCA Action | विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण हतागळे व त्याच्या एका साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | जबरी चोरी, खंडणी, विनयभंग असे गंभीर गुन्हे करुन विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण युवराज हतागळे व त्याच्या साथीदार भावावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आरोपींनी विमानतळ परिसरात राहणाऱ्या फिर्य़ादी यांना तुझा मित्र अरबाज कुठे आहे अशी विचारणा करुन शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करुन त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी जबरदस्तीने पँन्टच्या खिशातून 1700 रुपये काढून घेतले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात दोघांवर आयपीसी 394, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी घडली होती. (Pune Police MCOCA Action)

दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा गुन्हा टोळी प्रमुख करण युवराज हतागळे (वय-26), प्रविण युवराज हतागळे (वय-21 दोघे रा. यमुनानगर वसाहत, विमाननगर, पुणे) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन करण हतागळे याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या करण हतागळे याचे पूर्वीचे पोलीस रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत.
तर त्याचा साथीदार प्रवीण हतागळे याच्यावर दोन गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी स्वत:ची गुन्हेगारी टोळी तयार करुन विमानतळ परिसरात टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोडा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे. असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील
(ACP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी,
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोळ्ळुरे, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, भोर, शिंदे, मांजरे,
शेख यांच्या पथकाने केली.

Related Posts