IMPIMP

Pune Police Mcoca Action | तलावारीचा धाक दाखवून व्यवसायिकांना लुटणाऱ्या रोहन चव्हाण व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 81 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MCOCA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Mcoca Action | फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीतील व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या रोहन चव्हाण व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 81 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police Mcoca Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुण्यातील बुधवार पेठेतील व्हिडिओ पार्लरच्या दुकानात घसून व्यावसायिक व कामगार यांना तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गल्ल्यातील रोख 5 हजार 360 रुपये चोरून नेले. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात आयपीसी 392,504,506, 395, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्ह्यातील साक्षीदारांकडे पोलिसांनी चौकशी केली असता व्हिडिओ पार्लरच्या बाहेरील पानटपरीवर व्यवसाय करत असताना सहा अनोळखी दुचाकीवरुन आले. त्यापैकी तिघेजण हातात तलवारी घेऊन व्हिडिओ पार्लरमध्ये गेले. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन हातातील तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तर इतर तीन अनोळखी व्यक्तींनी पानटपरीच्या गल्ल्यातून 1750 रुपये घेऊन निघून गेले. (Pune Police Mcoca Action)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी किरण रमेश गालफाडे (वय-24 रा. मंगळवार पेठ, पुणे), जतिन संतोष पवार (वय-21 रा. बिबवेवाडी, पुणे), अक्षय संजय सगळगिळे (वय-20 रा. लोहगाव, पुणे) यांना अटक केली आहे. तर टोळी प्रमुख रोहन जयदीप चव्हाण, ऋषिकेश फुलचंद रवेलिया (वय-21 रा. लोहगाव), रोहन चव्हाण याचा एक साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी आरोपीचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता आरोपी रोहन चव्हाण याने स्वत:च्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार केली आहे. या टोळीत त्याने वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी परिसरात वर्चस्व राखण्यासाठी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केले आहेत. या टोळीने पुणे शहरामध्ये दहशत निर्माण केली असून त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा (Sr PI Dadasaheb Chudappa) यांनी परिमंडळ- 1 पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल,
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप (PI Mangesh Jagtap), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर
(PI Anita Hivarkar), सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खडके,
अजित शिंदे,
पंकज देशमुख, शशिकांत ननावरे यांच्या पथकाने केली.

Related Posts