IMPIMP

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Fake Document

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाने रितसर खरेदी केलेल्या जमीनीचे बनावट कागदपत्र (Fake Document) तयार करुन ती जमीन शासकीय प्रक्रियेमध्ये वापरात आणली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तक्रारदार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अमित जयप्रकाश गोयल (वय-40 रा. माया बिल्डींग, गंगा सॅटेलाईट, वानवडी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी लाझरस सत्यनाथ चिन्नाप्पा, सांता लाझरस चिन्नाप्पा (रा. लेन नं. 3, मैत्री पार्क चेंबुर, मुंबई) यांच्यावर आयपीसी 120(ब), 465, 466, 467, 468, 469, 471, 474, 419, 427, 204 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1980 ते आजपर्य़ंत धर्मादाय आयुक्त कार्यालय व पुणे शहर परिसरात घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे धर्मादाय कार्यालय पुणे येथील कर्मचारी आहेत.
अमित गोयल यांच्या कंपनीने सहा एकर जमीन रितसर खरेदी केली आहे.
ही जमीन लुबाडण्यासाठी आरोपींनी संगनमत करुन गोयल यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीनेचे बानवाट कागदपत्र
तयार केले. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवले. या कागदपत्रांच्या आधारे गोयल यांची जमीन शासकीय
प्रक्रियेमध्ये वापरात आणली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. पुढील तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वेताळ (PI Vetal) करीत आहेत.

Related Posts