IMPIMP

Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 94 वी कारवाई

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार महेश उर्फ दाद्या बबन गजेसिंह Mahesh alias Dadya Baban Gajesingh (वय- 29 रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 94 वी कारवाई आहे.

महेश उर्फ दाद्या गजेसिंह हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने कोंढवा, हडपसर, मुंढवा व वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार, लाकडी दांडके यासारख्या हत्यारांसह खुन, जबरी चोरी, दरोडा, गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी महेश उर्फ दाद्या गजेसिंह याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महेश गजेसिंह याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे,
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Related Posts