IMPIMP

Pune Police MPDA Action | तरुणीवर हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 60 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | सदाशिव पेठ भागात एका तरुणीवर कोयत्याने (Koyta) हल्ला करणारा अट्टल गुन्हेगार शंतनू लक्ष्मण जाधव Shantanu Laxman Jadhav (वय- 20 रा. मु.डोंगरगाव, पो. कोळवळ, ता. मुळशी, जि. पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 60 वी कारवाई आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आरोपी शंतनू जाधव हा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishrambag Police Station) हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) आहे. त्याने विश्रामबाग, कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत कोयता, तलवार या सारख्या हत्यारांसह खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), विनयभंग (Molestation Case), दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या पासून जीवाला व मालमत्तेला नुकसान होण्याच्या भीतीने नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड (Sr PI Ravindra Gaikwad) यांनी आरोपी शंतनू जाधव याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव व कागदपत्रे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर होती.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी शंतनू जाधव याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये
नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कमगिरी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड,
गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.