IMPIMP

Pune Crime News | गणेश पेठ : पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घुण खून

Attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून हल्लेखोरांनी तरुणाचा पाठलाग करुन त्याला इमारतीच्या छतावर गाठले अन् कोयत्याने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खून (Murder In Pune) केला. ही घटना गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सिद्धार्थ नंदकुमार हादगे Siddharth Nandkumar Hadge (वय २९, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. फरासखाना पोलिसांनी (Pune Police) हर्षल पवार व त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे याचे हर्षल पवार व त्याच्या साथीदाराशी किरकोळ वाद झाले होते. सिद्धार्थ हा रात्री बुरुड गल्लीत असताना हर्षल पवार व त्याचे साथीदार हे कोयते घेऊन आले. त्यांना पाहून सिद्धार्थ लपण्यासाठी ओसवाल बिल्डिंगमध्ये शिरला. तो पळत पळत छतावर गेला. पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने हल्लेखोरांनी त्याला गाठून कोयत्याने वार करुन त्याचा खून (Pune Murder News) केला. फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत लागोपाठ दोन दिवस दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत.