IMPIMP

Pune Police | पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! बेजबाबदार व बेशिस्तीचे गैरवर्तन केल्याचा ठपका

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Police | कामात हलगर्जीपणा केल्याचा ठेवत पुणे पोलिसांच्या (Pune Police) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक भाऊसाहेब रामहरी खटके (Bhausaheb Ramhari Khatke) यांना तडकाफडकी निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी काढले आहेत. (Pune Police)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाऊसाहेब खटके यांनी कर्तव्य करत असताना अधिकारी व कर्मचारी यांची बदनामी करण्याचे तसेच पोलीस दलातील शिस्त (Discipline), नियम (Rules) पाळत नसल्याचे आढळून आले. तसेच कर्तव्यावर असताना बेजबाबदार व बेशिस्तीचे गैरवर्तन केल्याचा ठपका खटके यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खटके यांच्या प्राथमिक चौकशीत त्यांचे गैरवर्तन पोलीस दलातील इतर कर्मचारी यांच्यावर होऊन पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा निर्माण करण्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

भाऊसाहेब खटके यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कर्तव्यावर हजर असताना खटके यांनी काही वेळा कारवाईची बतावणी करून हातगाडीवाल्यांकडून पैसे उकळले होते.

 

Web Title :- Pune Police | Sudden suspension of Pune police personnel Bhausaheb Ramhari Khatke Mundhwa Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील ‘एरिया 37 क्लब’वर पोलिसांचा छापा ! रमनलाल पोरवाल, सुभाष टेकवानी, किशोर जैन, राकेश कोंढेला जुगार खेळताना पकडलं; हॉटेल सुपरवायझर सुनिल मुंदडा, यतिन शहासह 6 जणांविरूध्द FIR, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime | धक्कादायक ! रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग

Karuna Sharma | ‘धनंजय मुंडेंच्या प्रेमकहानीचं….’; करूणा शर्मांनी अर्ज भरताना केला मोठा गौप्यस्फोट!

 

Related Posts