IMPIMP

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

by nagesh
Khadakwasla Dam Pune | The release of water from Khadakwasla Dam was stopped

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठी कमी होऊन पाणी संकट उभे राहते की काय असे वाटत होते. मात्र, आता धरण (Dam) परिसरात पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने टेमघर (Temghar), वरसगाव (Varasgaon), पानशेत (Panshet) आणि खडकवासला (Khadakwasla) धरणसाखळीत (Dam Chain) पाणी पातळी समाधानकारक वाढत आहे. मंगळवारी रात्रीपासून आज सकाळपर्यंत या धरण परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंगळवारपासून आज सकाळपर्यंत धरण परिसरात झालेला पाऊस

टेमघर धरण क्षेत्र – 65 मिलिमीटर

वरसगाव धरण क्षेत्र – 70 मि.मी

पानशेत धरण क्षेत्र – 68 मि.मी

खडकवासला धरण क्षेत्र – 18 मि.मी

 

सध्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 3.67 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 12.59 टक्के पाणीसाठा (Water Storage) जमा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांत 3.35 टीएमसी पाणीसाठा होता. जलसंपदा विभागाने (Water Resources Department) सांगितले की, मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी 0.32 टीएमसीने पाणीसाठ्यात (Pune Rain) वाढ झाली आहे.

 

Web Title :- Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

 

 

हे देखील वाचा :

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

 

Related Posts