IMPIMP

Pune Rains | पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरण प्रकल्पात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, एका दिवसात 1 TMC पाणीसाठा वाढला

by nagesh
Khadakwasla Dam Pune | The release of water from Khadakwasla Dam was stopped

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Rains | पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पात गेल्या ४ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा गेल्या वर्षीपेक्षा अधिक झाला आहे. सोमवारी सकाळी या चार धरणातील एकूण पाणी साठा ८.७० टीएमसी झाला असून २९.८५ टक्के इतका झाला आहे. गतवर्षी तो ८.६४ टीएमसी आणि २९.६२ टक्के इतका होता. सध्या पाऊस सुरु असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. (Pune Rains)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोमवारी सकाळपर्यंत वरसगाव धरण क्षेत्रात ७४, पानशेत ८५, टेमघर ७५, खडकवासला धरणात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. मुळशी १०३, पवना ११७, गुंजवणी ७७, पिंपळगाव जोगे ९७, माणिक डोह ११६, येडगाव ४८, वडज ४९, डिंभे ४२, घोड ५, विसापूर ४, चिल्हेवाडी ४३, कळमोडी १०१, चासकमान ५०, भामा आसखेड ४५, वडिवळे ९४, आंद्रा ४९, कासारसाई २०, निरा देवधर ४६, भाटघर ३६, नाझरे ६ आणि उजनी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Pune Rains)

 

पुणे शहरात शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळपर्यंत २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
त्याचप्रमाणे लवासा १७४, गिरीवन ८७, लोणावळा ७४, तळेगाव ५९, भोर ५५, चिंचवड ३६, लवळे ३३, माळीण ३२, राजगुरुनगर २४,
पाषाण २३, कोरेगाव पार्क २०, नारायणगाव १७, हडपसर १३, शिरुर १३, पुरंदर १२, आंबेगाव ७, दौंड,
बारामती ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

पुढील चार दिवस पुणे शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे लक्षात घेऊन घाटातून जाताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Rains | Consolation to the people of Pune The Khadakwasla Dam project has more water storage than last year an increase of 1 TMC in one day

 

हे देखील वाचा :

Amarnath Yatra Cloudburst | दुर्देवी ! अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील 2 नागरिकांचा मृत्यू

Devendra Fadnavis | ‘आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ – देवेंद्र फडणवीस

CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Meet Amit Shah | गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नाही ? तर ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर, शिंदे-शहा भेटीची Inside Story

 

Related Posts