IMPIMP

Pune Swargate Crime | महिलेचा पाठलाग करुन विनयभंग, एकाला अटक; स्वारगेट परिसरातील प्रकार

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Swargate Crime | विवाहित महिलेवर पाळत ठेवून तिचा पाठलाग करुन विनयभंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2022 ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत एकता मित्र मंडळाजवळ तसेच महिलेच्या घरी घडला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Molestation Case)

याबाबत इंदिरानगर गुलटेकडी येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन खाजा हुसेन परांडे (वय-48 रा. गुलटेकडी, पुणे) आयपीसी 354ड, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेवर पाळत ठेवून पाठलाग केला. तसेच महिलेकडे लग्नाची मागणी घातली. मात्र, महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला शिवीगाळ केली. तसेच तु लग्न केले नाही तर मी तुला जगु देणार नाही, तुझ्या मुलींना त्रास देईल अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

धायरी : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने विषारी औषध प्राषन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती, सासु आणि सासरे यांच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धायरी येथील एका सोसायटीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना घरगुती कारणावरुन वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण केली. या त्रासाला कंटाळून महिलेने किटक नाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.फिर्य़ादी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तसेच मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts