IMPIMP

Pune Traffic Change | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत काहीसा बदल; जाणून घ्या

by nagesh
Pune Traffic Change | pune traffic diversions on wednesday and thursday for palkhi sohala in pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Traffic Change | श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Shri Sant Dnyaneshwar Maharaj) व श्री संत तुकाराम महाराज (Shri Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील (Pune Traffic Change) ग्रामीण भागातील वाहतुकीमध्ये बदल केले आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 ते 28 जून रोजी या कालावधीमध्ये आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 जून ते 5 जुलै रोजी या कालावधीमध्ये पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहे. त्याचबरोबर या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी जारी केले आहेत. (Pune Traffic Change)

पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंदमार्गे पंढरपूर अशी जाणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूरमार्गाने रोटी घाटमार्गे बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरला जाणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतूक बदल –

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) –

26 जूनच्या रात्री 8 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडी मशिन चौक-कात्रज-कापुरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम); तसेच जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) –

26 व 27 जून या कालावधीत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे; तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा या मार्गाचा वापर करावा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम) –

27 जून रोजी रात्री 11 वाजता ते 28 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीरेकडे; तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

Web Title :- Pune Traffic Change | pune traffic diversions on wednesday and thursday for palkhi sohala in pune district

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका

Related Posts