IMPIMP

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

by sachinsitapure
Punit Balan Group (PBG)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलिस कल्याण निधीला (Pune Police Welfare Fund) ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन (Punit Balan) आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या (Manikchand Oxyrich) संचालिका जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश झोन तीनचे डीसीपी संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik), मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुणे पोलिस संघाने पुनित बालन ग्रुपवर अखेरच्या षटकामध्ये निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये ५ गडी गमावून ९२ धावांचे आव्हान उभे केले. कुणाल भिलारे (३९ धावा), पुनित बालन यांनी नाबाद १५ धावा आणि राहूल साठे याने २३ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. पुणे पोलिस संघाने अखेरच्या षटकामध्ये हे लक्ष्य गाठले. पप्पु तोडकर याने ४४ धावा आणि किरण गायकवाड याने नाबाद ३५ धावा करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः

पुनित बालन ग्रुपः १० षटकात ५ गडी बाद ९२ धावा (कुणाल भिलारे ३९, पुनित बालन नाबाद १५, राहूल साठे २३, अतुल महनगुडे ३-२९) पराभूत वि. पुणे पोलिसः ९.३ षटकात २ गडी बाद ९६ धावा (पप्पु तोडकर ४४, किरण गायकवाड नाबाद ३५, अक्षय जाधव २-१४); सामनावीरः पप्पु तोडकर.

Related Posts