IMPIMP

Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी

by nagesh
Pune News | Various organizations rallied against the oppression of women; Demand for stricter security laws

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –   Pune News | काही दिवसापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये (Crime Against Woman) वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पक्ष संघटनांच्या महिलांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले. यावेळी महिला सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून कडक कायदा करण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (dr rajesh deshmukh collector) यांना दिले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या वेळी बहुजन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती साठे (Aarti Sathe, President of Bahujan Yuva Foundation), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगीता आठवले (West Maharashtra president of the Republican Party of India Women’s Front, Sangeeta Athavale), नगरसेविका पूजा मनीष आनंद (Corporator Pooja Manish Anand), काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी (Congress Sangeeta Tiwari), भीम छावा संघटनेच्या अध्यक्षा निलम गायकवाड (Nilam Gaikwad), रिपब्लिकन युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डबाळे (Suvarna Dambale), निशा सुक्रे (Nisha Sukre) आदी उपस्थित होते.

 

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, दामिनी मार्शलच्या धर्तीवर रेल्वे स्थानकावर महिला पोलिस पथक निर्माण करावे.
प्रत्येक रेल्वे व बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, रात्री प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करून त्यांची वारंवार तपासणी करण्यात यावी.
पीडित महिलांच्या मदतीसाठी निर्भया कक्ष उभारावा, राज्य महिला आयोगावर तत्काळ नेमणुका कराव्या यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. (Pune News)

 

Web Title : Pune News | Various organizations rallied against the oppression of women; Demand for stricter security laws

 

हे देखील वाचा :

खुशखबर ! SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट, मार्च 2022 पर्यंत मिळेल ‘या’ विशेष योजनेचा लाभ; जाणून घ्या

Pune News | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती

Pune News | पुण्यातील नगररोड परिसरात डेंग्यूचा उद्रेक, अनेकांना डेंग्यू सदृश्य ताप

Palghar Minor Girl Murder | खळबळजनक ! दुकानात गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचे विकृत कृत्य, मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

 

Related Posts