IMPIMP

Ramdas Athavale | ‘…तर संभाजीराजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते’ – रामदास आठवले

by nagesh
Ramdas Athavale | '... then Sambhaji Raje would have been elected as BJP candidate' - Ramdas Athavale

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनमाजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Former MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यावर शिवसेनेने (Shivsena) अन्याय केला. भारतीय जनता पक्षाशी (BJP) चर्चा केली असती, तर राजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते. मात्र, ही राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) राजेंनी अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार केला होता. शिवाय, शिवसेनेने राजेंना दिलेला शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी आणि शिवसेनेने धोका दिल्यानेच आज राजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले (Ramdas Athavale) बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (RPI) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण (City President Shailendra Chavan), प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव (Balasaheb Janrao), माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende), पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर (Parashuram Wadekar), संपर्कप्रमुख अशोक कांबळे (Ashok Kamble), अशोक शिरोळे (Ashok Shirole), सचिव महिपाल वाघमारे (Mahipal Waghmare), श्याम सदाफुले (Shyam Sadafule), बाबुराव घाडगे (Baburao Ghadge), कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड (Basavaraj Gaikwad), संगीता आठवले (Sangeeta Athavale), शशिकला वाघमारे (Shashikala Waghmare), हिमाली कांबळे (Himali Kamble), असीत गांगुर्डे (Asit Gangurde), संजय सोनवणे (Sanjay Sonawane), निलेश आल्हाट (Nilesh Alhat) आदी उपस्थित होते.

 

रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) यांच्यात अंतर्गत वाद आहेत. काँग्रेस पाठींबा ठेवायचा की नाही, यावर विचार करत आहे. काँग्रेसमध्ये धाडस दाखवत पाठिंबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू. काँग्रेस खिळखीळी झाली आहे. काँग्रेसला नेता राहिला नाही. कॉग्रेसला अध्यक्ष मिळेना. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा सामना करणे काँग्रेसच्या आवाक्यात नाही.

 

भोंग्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका अयोग्य आहे. अजान आणि प्रार्थना झाल्या पाहिजेत. निवडणूक आल्या की असे जातीय राजकारण होते. हे थांबायला हवे. रिपब्लिकन ऐक्य होईल असे वाटत नाही. कोणाच्याही नेतृत्वात ऐक्य झालेच, तर माझा गट त्यात नक्की सहभागी होईल. याआधीही अनेकदा ऐक्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी राहिला आहे. समाजाने ऐक्य केले, तर आपण प्रत्येकाने एक पाऊल मागे येत त्यात सहभागी व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महापालिका निवडणुकीचा (Municipal Election) आढावा घेत आठवले म्हणाले, महापालिका निवडणूक सोडत झाली आहे. 23 वॉर्ड शेड्युल कास्टसाठी सोडण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे.’ राज्यसभेची सहावी जागा आम्ही निवडून आणू. भाजपचा उमेदवार तेवढी मते मिळवण्यात यशस्वी ठरेल, असेही ते म्हणाले.

 

आपण संविधानाचे (Constitution) पालन करत शांततेचा मार्ग स्वीकारायला हवा. पंढरपूर मंदिर असो वा अनेक वाद असोत.
धर्माच्या नावावर नवनवीन वाद काढू नयेत. शांततापूर्ण समाज निर्माण व्हावा, असेच आपले संविधान आहे.

 

काय म्हणाले आठवले…

महाराष्ट्राला जीएसटीचा (GST) परतावा दिला आहे.

अजूनही परतावा राहिला असल्यास त्यासाठी प्रयत्न करू.

केंद्राच्या योजनाचे पैसे महाराष्ट्रात आलेत

नॅशनल हेरॉल्डबाबत (National Herald) आलेल्या नोटिशीला राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर द्यावीत.

हार्दिक पटेलने (Hardik Patel) भाजपमध्ये प्रवेश केलाय, याचा आनंद आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणी (Sakinaka Rape Case) कोर्टने पीडितेला न्याय दिला.

न्यायालयाचे आभार मानतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ramdas Athavale | ‘… then Sambhaji Raje would have been elected as BJP candidate’ – Ramdas Athavale

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीत ‘मोठा’ बदल ! संयुक्त प्रकल्पाच्या नावाखाली 1500 चौ. फुटांपर्यंतच्या वास्तु वाटपांच्या खैरातीला लावला ‘ब्रेक’

Ajit Pawar | ‘रात्री कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार’ – अजित पवार

Pune Crime | तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, विवाहित तरुणाची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

 

Related Posts