IMPIMP

Ramdas Athawale On BJP-MNS Alliance | ‘भाजपला मनसेची गरज नाही’; रामदास आठवले यांनी स्पष्टच सांगितलं

by nagesh
Ramdas Athawale On BJP-MNS Alliance | BJP Does Need MNS Ramdas Athawale In Solapur

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Ramdas Athawale On BJP-MNS Alliance | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यावरुन (Loudspeaker On Mosque) राज्यात वादंग निर्माण झाला आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकातही राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या भुमिकेवरुन आणि भाजप आणि मनसेची (BJP-MNS Alliance) सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्येष्ठ संशोधक चंद्रकांत पांडव (Chandrakant Pandav) यांच्या सत्काराच्या निमित्ताने सोलापूरात (Solapur) आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप आणि मनसे युतीच्या सुरू असणा-या चर्चेवर देखील रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. ”दोन समाजात तेढ निर्माण करणारी राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे. त्यांच्या झेंड्यात पूर्वी सर्व रंग होते. आज त्यांनी केवळ भगवा रंग ठेवला आहे. भगवा रंग हा वाद लावणारा रंग नाही, तो शांततेचे प्रतीक आहे. भाजपला त्यांची गरज नाही,” असं आठवले यांनी म्हटलं आहे. (Ramdas Athawale On BJP-MNS Alliance)

 

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, ”हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याला विरोध नाही मात्र ती मंदिरात म्हंटली पाहिजे.
दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळासमोर म्हणण्याची गरज नाही. मस्जिदच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्याचा आवाज कमी करण्याचा विचार करता येईल.
सामंजस्याने भोंगे काढता येतील. पोलिसांनी बळजबरीने ते काढू नयेत.
सर्वच धर्मात परंपरा आहेत. भीम जयंतीचे कार्यक्रम, मिरवणुका रात्री उशिरापर्यंत होतात.
केवळ विशिष्ट धर्माच्याच भोंग्यावर कारवाई करता येणार नाही.
युपीत योगी यांनी पहिल्यांदा मंदिरांचे भोंगे काढले नंतर मस्जिदचे भोंगे हटवले.
राज ठाकरे यांनी वाद निर्माण करू नयेत. त्यांनी असे वाद निर्माण केले तरी भाजप मनसेला बरोबर घेणार नाही.”

 

Web Title :- Ramdas Athawale On BJP-MNS Alliance | BJP Does Need MNS Ramdas Athawale In Solapur

 

हे देखील वाचा :

Anti-Corruption Bureau (ACB) | 5 लाखांची लाच स्वीकारताना विद्यापीठाचा कुलगुरू एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

 

Related Posts