IMPIMP

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

by nagesh
Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon update no uptick in monsoon over south india to enter weak marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Monsoon Update | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात उन्हाचा तडाखा लागला आहे. मात्र गरमीपासून आता माणसाची लवकरच मुक्तता होणार असल्याची माहिती आहे. कारण देशात यावर्षी मेघराजा लवकरच अवतरणार आहे. यंदा 10 दिवस आधीच पाऊस (Rain) दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात (Arabian Sea) झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सून (Monsoon Update) भारतात लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे नागरीकांना उन्हापासून सुटका होणार आहे. याबाबत अंदाज युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट संस्थेने (European Center for Medium Range Weather) वर्तवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

साधारण 20 ते 21 मे रोजी मान्सून अंदमानात (Andaman) दाखल होईल. त्यानंतर 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळात (Kerala) दाखल होईल. गतवर्षी केरळमध्ये 1 जूनला मान्सूनचे आगमन झाले हाेते. मात्र, चक्रीवादळामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन 3 जूनपर्यंत लांबणीवर पडले होते. त्यामुळे आताही सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यासच मान्सून 28 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर मान्सून भारताच्या इतर भागांच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करेल. असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर’ने वर्तवला आहे. (Monsoon Update)

 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात उन्हाचा चटका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे (Temperature) माणसांच्या जीवाची काहिली होत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर आहे. विदर्भात (Vidarbha) बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा 44 अंशाच्या (44 Degrees) आसपास आहे. या ठिकाणी 8 आणि 9 मे रोजी तुरळक भागामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, यानंतर मान्सून लवकरच आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून 7 जूनपर्यंत तळकोकणात (Konkan) दाखल होईल. त्यानंतर 4 दिवसांत म्हणजे 11 जूनपर्यंत मान्सून मुंबईत (Mumbai) दाखल होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Monsoon Update | monsoon rain will arrive 10 days early in kerla says weather forecast

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Weather Update | राज्यात उन्हाचा चटका कायम ! विदर्भात 8, 9 मे रोजी उष्णतेच्या झळा

Sanjay Raut on Chandrakant Patil | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘अब चंपाकली मुरझायी हैं..’

 

Related Posts