IMPIMP

Ramdas Athawale | ‘2024 मध्येही मोदी सरकार येणार’ – रामदास आठवले

by nagesh
Ramdas Athawale | ramdas athavale statement on modi government in 2024 in beed

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Ramdas Athawale | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आगामी
2024 मध्ये कोणतं सरकार येणार याबाबत मोठं भाकीत केलं आहे. ‘विविध विकास कामांच्या पाठबळावर देशात आगामी लोकसभा 2024 (Lok
Sabha Election 2024) मध्येही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार असेल, ‘ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने (Central Government) आठ वर्षांत महामार्गांसह वेगवेगळ्या क्षेत्रांत विकास घडवून आणला. विविध योजना आखल्या व त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. देशात प्रगती घडवून आणली. कित्येक वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला असा विकास घडवता आला नाही. विकास, प्रगतीच्या बळावर 2024 च्या पंचवार्षिक निवडणुकीतही मोदींचेच नेतृत्व असेल.” असं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.

 

रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं रामदास आठवले म्हणाले. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह देशात सर्व विरोधक एकत्र आले तरी त्यांना मोदींशी सामना करणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, उद्याच्या होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीवरुनही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरपीआय’ला राज्यसभेची एखादी जागा मिळायला पाहिजे होती, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) कितीही प्रयत्न केले तरी 6 व्या जागेसाठी धनंजय महाडिकच (Dhananjay Mahadik) निवडून येतील.

 

Web Title :-  Ramdas Athawale | ramdas athavale statement on modi government in 2024 in beed

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 6 वर्षाच्या चिमुकलीवर 36 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने वेतनात होईल भरघोस वाढ

Solapur Crime | पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुण व्यावसायिकानं संपवलं जीवन; आत्महत्या करण्यापूर्वी केला WhatsApp मेसेज

Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील CISF जवान आणि सहकारी महिलेची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

 

Related Posts