IMPIMP

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

by nagesh
CM Eknath Shinde Ayodhya Tour | ramdas kadam attacks on sanjay raut over ayodhya rally comment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) अखेर मुहूर्त मिळाला आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 16 ते 17 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. यासंदर्भात आज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत बैठक
झाली. या बैठकीला शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे देखील हजर होते. त्यामुळे रामदास कदम यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार
अशी चर्चा सुरु झाली. मात्र त्यांना मंत्रिपद देण्यावरुन शिंदे गटात नाराजी होती. परंतु आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीच यावर रोखठोक
भाष्य करुन विषय संपवला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तार विषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता जास्त काळ वाट पहावी लागणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार उद्या किंवा परवा होईल अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर तुम्ही मंत्रिमंडळात असणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रामदास कदम यांनी सांगितले की, रामदास कदम मंत्रिमंडळात नसेल आणि विधानपरिषदेतही (Legislative Council) नसेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

यापूर्वी शिवसेनेत असताना 2019 मध्ये मविआ सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले होते.
त्यांचा पर्यावरण खात्याचा (Environment Department) कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
यावरुन रामदास कदम यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती.
आदित्य ठाकरे माझ्यासोबत राहून शिकले, पण नंतर ते माझेच खाते घेतील, असे वाटले नव्हते.
मी पर्यावरणमंत्री असताना घेतलेल्या प्लॅस्टिकबंदीसारख्या निर्णयांचे श्रेय आदित्य ठाकरे यांना दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

 

आता नव्या सरकारमध्ये मंत्रीपद आणि विधानपरिषदेची आमदारकी,
अशा दोन्ही गोष्टी नाकारताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांची समजूत नक्की कशी काढली असावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
परंतु मंत्रिमडळ किंवा आमदारकीऐवजी रामदास कदम यांना अन्यत्र कुठे सामावून घेतले जाणार का, हे लवकरच समजेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : – Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

हॅकर इच्छा असूनही करू शकणार नाही तुमचे WhatsApp अकाऊंट हॅक, कंपनीचे हे फीचर आश्चर्यकारक !

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

 

Related Posts