IMPIMP

हॅकर इच्छा असूनही करू शकणार नाही तुमचे WhatsApp अकाऊंट हॅक, कंपनीचे हे फीचर आश्चर्यकारक !

by nagesh
Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाWhatsApp युजर्ससाठी नवनवीन फीचर्स जारी करत असते. त्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. आता कंपनी
एका नवीन सिक्युरिटी फीचरवर काम करत आहे. त्यामुळे हॅकर्सना WhatsApp अकाऊंट हॅक करणे कठीण होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रिपोर्टनुसार, WhatsApp इंस्टाग्राम सारख्या लॉगिन अप्रूव्हल फीचरवर काम करत आहे. यासह, जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाईसवरून लॉग इन करता तेव्हा तुम्हाला मेसेजिंग अ‍ॅपवरून एक सूचना पाठवली जाईल. या प्रकारची सूचना सध्या दुसर्‍या डिव्हाईसवरून लॉग इन केल्यास इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर प्राप्त होते.

 

आगामी व्हॉट्सअ‍ॅप फीचर प्लॅटफॉर्मची सुरक्षा वाढवेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचर्सवर लक्ष ठेवणारी साइट Wabetainfo ने हे पहिल्यांदा सांगितले होते. ही साइट कंपनीच्या आगामी वैशिष्ट्यांबद्दल सांगते.

 

त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप असे एक नवीन फीचर विकसित करत आहे. यासह, यूजर्सना अनधिकृत लॉगिनपासून संरक्षण मिळेल. जेव्हा कोणी त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा यूजर्सना इन – अ‍ॅप सूचना दिली जाईल.

 

लॉगिन विनंती स्वीकारल्यानंतरच व्हॉट्सअ‍ॅप खाते इतर डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्यास सक्षम असेल.
याद्वारे तुम्ही इतर कोणतीही लॉगिन विनंती नाकारू शकता.
म्हणजेच, एखाद्याला 6 – अंकी कोड जरी मिळाला तरी तो तुम्ही स्वीकारल्याशिवाय तो लॉग इन करू शकणार नाही.

 

आणखी एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला जास्त कंट्रोल देण्यावर काम करत आहे.
याच्या मदतीने ग्रुप अ‍ॅडमिन्स ग्रुपमधील दुसर्‍याने पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतो.
यामुळे, अ‍ॅडमिन आक्षेपार्ह माहिती डिलीट करू शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – WhatsApp | whatsapp upcoming login approval feature will keep hackers away

 

हे देखील वाचा :

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

 

Related Posts