IMPIMP

Ramesh Kumar | ‘जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा’, ‘या’ आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

by nagesh
Ramesh Kumar | when rape is inevitable enjoy it karnataka congress mla shocking statement

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात महिलांवर बलात्काराच्या (rape) घटना घडत असताना काही राजकीय आणि जबाबदार व्यक्तींकडून केली जाणारी विधाने लाजीरवाणी असतात. कर्नाटक (Karnataka) विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress leader), माजी मंत्री रमेश कुमार (Ramesh Kumar) यांनी बलात्काराबाबत गुरुवारी विधानसभेत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बेळगाव (Belgaum) येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) बोलताना रमेश कुमार (Ramesh Kumar) यांनी सभापतींना सांगितले की, तुमची स्थिती या म्हणी सारखी आहे की, तुम्ही बलात्कार थांबवू शकत नसाल तर झोपा आणि मजा (enjoy) करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

रमेश कुमार (Ramesh Kumar) यांनी असे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बलात्काराच्या मुद्यावर अशी टीका केली होती. गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलण्यासाठी नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी (Speaker Vishweshwar Hegde Kageri) टाळण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही जे काही ठरवाल ते मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करु शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार सुरेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितले की, एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य (Rape is inevitable) असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले. कुमार यांनी यापूर्वी 2018-19 मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशा प्रकारचे विधान केले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

यापूर्वी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष असताना रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती.
त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या महिला सदस्यांसह आमदारांनी अधिवेशनात त्यांच्या विधानाचा निषेध केला होता.
अशा घृणास्पद आणि निर्लज्ज वर्तनासाठी सभागृहाने संपूर्ण स्त्रीत्वाची,
प्रत्येक माता, बहीण आणि मुलींची माफी मागितली पाहिजे असे आमदार सोम्या रेड्डी (Somya Reddy) म्हटले होते.

 

माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी
फेब्रुवारी 2019 मध्ये रमेश कुमार यांनी, माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे.
बलात्कार फक्त एकदाच झाला. तिथं सोडलं असतं तर ते संपलं असतं.
बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला तुरुंगात टाकले जाते.
हे कसे, कधी आणि किती वेळा घडले याची चौकशी त्यांचे वकील किंवा ईश्वरप्पा (त्यावेळचे आमदार आणि आताचे भाजप मंत्री) यांच्यासारखे करतात.
खटल्याच्या शेवटी, पिडिता म्हणेल की उलटतपासणी दरम्यान बलात्कार प्रत्यक्षात एकदाच झाला होता. मात्र, कोर्टात अनेक वेळा झाला.
माझीही अवस्था अशीच झाली आहे, असे धक्कादायक विधान कुमार यांनी केले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Ramesh Kumar | when rape is inevitable enjoy it karnataka congress mla shocking statement

 

हे देखील वाचा :

Ex-Pornstar Mia Khalifa | मिया खलिफाची ‘ब्रेस्ट’ नकली, टिकटॉक व्हिडिओ शेअर करून तिनं केला खुलासा, म्हणाली…

Samantha Prabhu | समंथा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, तापसीसोबत दिसणार ‘या’ चित्रपटात

Konica Layak | सोनू सूदने रायफल गिफ्ट दिलेल्या राष्ट्रीय नेमबाज ‘कोनिका लायक’ची आत्महत्या

 

Related Posts