IMPIMP

Rishi Sunak | ब्रिटन : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर

by nagesh
Rishi Sunak | rishi sunak tops ballot in second round of tory leadership contest

लंडन : वृत्तसंस्थाRishi Sunak | ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधानपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यामध्ये ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सर्वाधिक 88 मते मिळाल्यानंतर सुनक यांनी गुरूवारी झालेल्या दुसर्‍या फेरीच्या मतमोजणीत सर्वाधिक 101 मते मिळवत बाजी मारली.

 

कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या 358 सदस्यांमधून हा उमेदवार निवडला जाणार आहे. पंतप्रधानपदाच्या लढाईच्या रिंगणात आता सुनक यांच्याव्यतिरिक्त पेनी मॉर्डंट, लिझ ट्रस, केमी बॅडेनोश आणि टोरी बॅकबेंचर हे चारच उमेदवार उरले आहेत. या चौघांना दुसर्‍या फेरीत अनुक्रमे 83, 64, 49, 32 मते मिळाली आहेत. (Rishi Sunak)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पहिल्या फेरीतील मते

ऋषी सुनक – 88
वाणिज्यमंत्री पेनी मॉर्डंट – 76
परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस – 50
माजी मंत्री केमी बॅडेनोच – 40
टॉम टुंगेंढट – 37
अ‍ॅटर्नी जनरल सुएला ब्रॅव्हरमन – 32

 

दुसर्‍या फेरीतील मते

ऋषी सुनक – 101
वाणिज्यमंत्री पेनी मॉर्डंट – 83
परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस – 64
माजी मंत्री केमी बॅडेनोश – 49
टोरी बॅकबेंचर – 32

 

माजी कॅबिनेटमंत्री जेरेमी हंट यांना पहिल्या फेरीत 18 मते मिळाली होती. त्यांनी सुनक यांना पाठिंबा दर्शवल्याने सुनक यांचे पारडे जड आहे. संसदेतील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या 358 सदस्यांच्या मतदानाची पुढील फेरी पुढील आठवड्याच्या सुरु होईल.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना 42 वर्षीय सुनक यांनी म्हटले की, महागाईवर मात करणे आणि ती आणखी वाढू न देणे ही माझी आर्थिक प्राथमिकता आहे, असे मला वाटते. महागाई ही शत्रू आहे व ती प्रत्येकाला गरीब करते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

करकपातीच्या मुद्द्यावर सुनक म्हणाले, मी संसदेत करकपातीची घोषणा करेन, परंतु मी ते जबाबदारीने करणार आहे. मी निवडणुका जिंकण्यासाठी कर कमी करण्याचे आश्वासन देत नाही, तर कर कमी करण्यासाठी मी निवडणुका जिंकणार आहे.

 

Web Title :- Rishi Sunak | rishi sunak tops ballot in second round of tory leadership contest

 

हे देखील वाचा :

World Expensive Share | गाडी-बंगला, नोकर-चाकर, बँक बॅलन्स… ‘या’ 1 शेअरच्या किमतीत सर्वकाही शक्य

Disha Patani Latest Photoshoot | ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशा पटानीने आपल्या ‘हॉटनेस’ने केले चाहत्यांना घायाळ

Deepak Kesarkar | ‘त्या’ विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी, म्हणाले…

Related Posts