IMPIMP

Rohit Pawar | अभिनेता किरण माने यांना रोहित पवारांचा पाठिंबा; जाणून घ्या नेमकी मानेंनी कोणती घेतलीय भुमिका

by nagesh
Rohit Pawar | NCP MLA rohit pawars support actor kiran mane dropped out serial star pravah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनविविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) सध्या सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेत विलास पाटील (Vilas Patil) ही भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र, आता किरण माने यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचं पुढे आलं आहे. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच (Political Roles) मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला आहे. माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील प्रतिक्रीया देताना किरण माने यांना पाठिंबा दिला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रीया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom) ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी; याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल. केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म (Constitutional Religion) आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारी नाही, असे ट्विट करत रोहित पवार यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद

काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी ट्विटरवरुन किरण मानेंना मालिकेतून काढल्याचा निषेध करत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. सावंत म्हणतात की, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपला सहन झाले नाही. त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद (Cultural Terrorism) आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

 

 

Web Title : Rohit Pawar | NCP MLA rohit pawars support actor kiran mane dropped out serial star pravah

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | सज्जन, निरागस, निष्पाप ! संजय राऊतांचा सल्ला; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता…’

ESIC Recruitment 2022 | 10 वी पास असो किंवा ग्रॅज्युएट, सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ! 3800 पेक्षा पदांसाठी भरती

Pune Crime | सराईत गुंडाने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

 

Related Posts