IMPIMP

Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule | बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

by nagesh
Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule | NCP mla rohit pawar answer chandrashekhar bawankule over mp supriya sule baramati remark

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule | भाजपाने मिशन बारामती (BJP Mission For Baramati) खुपच मनावर घेतले असून केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेते आतापासून 2024 च्या लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Leader Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले होते की, अमेठीतून राहुल गांधींना (Rahul Gandhi) हरवले, बारामतीत सुप्रिया सुळेंना (NCP MP Supriya Sule) हरवणार. आता बावनकुळेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज शुक्रवारी (9 सप्टेंबर) पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असताना ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोहित पवार यांनी म्हटले की, जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे. (Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule)

 

रोहित पवार म्हणाले, आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकर्‍यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत.

 

बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा दावा करणार्‍या भाजपा नेत्यांना सुनावताना रोहित पवार म्हणाले,
भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे.
तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे.
मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे.
लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे. सुडाचे राजकारण थांबवावे.
भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावे, अशी प्रार्थना मी गणपतीरायांना केल्याचे रोहित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule | NCP mla rohit pawar answer chandrashekhar bawankule over mp supriya sule baramati remark

 

हे देखील वाचा :

Stroke Risk | ‘हा’ ब्लड ग्रुप असलेल्यांना स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त, आतापासूनच व्हा सतर्क

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी आजपासून

Ajit Pawar | ‘नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतता कारण..’ अजित पवारांचा ‘दादा स्टाईल’ बावनकुळेंना टोला

Pune Cyber Crime | आलेल्या मेसेजवर क्लिक करणे माजी सैनिकाला पडले सव्वाचार लाखांना; दिघी पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts