IMPIMP

Ajit Pawar | ‘नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतता कारण..’ अजित पवारांचा ‘दादा स्टाईल’ बावनकुळेंना टोला

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन तुम्हाला एक मराठी म्हण माहित आहे का, कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही, ही वस्तुस्थिती आहे, नवीन नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत (Baramati) येतात कारण बारामतीत आल्यावर मीडिया बातमी उचलून धरते. त्यामुळे नवीन अध्याची हवा नवीन नवीन असते, असे ‘दादा स्टाईल’ उत्तर देत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना टोला लगावला. अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नवीन अध्यक्ष झाले की हुरुप येतो, तुम्ही प्रसिद्धी केव्हा देता, ते अध्यक्ष बारामतीला न येता दुसरीकडे गेले असते, तर तुम्ही इतकी प्रसिद्धी दिली असतीत का, बारामतीला गेल्यामुळेच तुम्ही बातमी केली आणि इतकी प्रसिद्धी मिळाली, असा टोला पवार यांनी लगावला.

 

मला त्या प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचाय, की तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता,
तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला 2019 ला उमेदवारी का नाकारली? त्याचे उत्तर द्या. त्याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. अर्थात, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण माझं मत आहे की कुणीही बारामतीत यावं. बारामतीकर सर्वांचं स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचं, कठलं बटण दाबायचं, हे बारामतीकरांना खूप चांगलं माहिती आहे, अशा शब्दात अजित पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला.

 

बारामतीत भाजपकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar taunts chandrashekhar bawankule over baramat our maharashtra politics news

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | आलेल्या मेसेजवर क्लिक करणे माजी सैनिकाला पडले सव्वाचार लाखांना; दिघी पोलीस ठाण्यात FIR

Chandrakant Patil | बारमती मतदारसंघावरुन राजकारण तापलं, भाजप-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये वाकयुद्ध; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना आव्हान, म्हणाले…

Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका

 

Related Posts