IMPIMP

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar slams tanaji sawant and ram shinde over statment about call

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या मतदार संघात येऊ नये, यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांना दहा फोन केले, असा दावा भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला होता. त्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी राम शिंदे आणि तानाजी सावंत यांना मैदानात येण्याचे आव्हान केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. “ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हे देखील माहीत नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनविण्याची भाषा करतो. अशा माणसाला मतदार संघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे यांनी पुड्या सोडणे बंद करावे. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि मैदानात या. तसेच यापुढे तुमच्या प्रचाराला त्यांना जरुर बोलवा.” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

 

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नाव न घेता रोहित पवार यांच्यावर टीका करत असतात.
येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीला आपल्याला हातात झाडू घेऊन हा मतदार संघ साफ करायचा आहे.
एका ठिकाणी जनशक्ती आहे, तर दुसऱ्या ठिकाणी धनशक्ती आहे. त्यांना वाटत आहे
की, धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र विकत घेऊ आणि अमेरिकेला जाऊ, असे तानाजी सावंत म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar slams tanaji sawant and ram shinde over statment about call

 

हे देखील वाचा :

Solapur Crime | तरुणीने रचला कट, लॉजवर बोलवून तरुणाचे काढले अश्लील फोटो, मागितली खंडणी; पण…

Tata Airbus | टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधार्‍यांचीच विरोधकांना धमकी, ‘या’ नेत्यांची नार्को टेस्ट करा, सर्व गुपिते समोर येतील

Avadhoot Gupte | अवधूत गुप्ते भाजपच्या विद्यमान मंत्र्यावर चित्रपट काढणार

 

Related Posts