IMPIMP

Supriya Sule | अखेर गोविंदबागेत शरद पवारांच्या पाठिशी दिसले अजित पवार! सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले फोटो

by sachinsitapure
Supriya Sule

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती येथील गोविंदबाग (Govindbaug ) निवासस्थानी राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी दिवाळीनिमित्त त्यांना भेटण्यासाठी येतात. यामध्ये पाडव्याच्या दिवसाला विशेष महत्व असते. यावेळी सर्व पवार कुटुंबिय देखील गोविंदबाग येथे जमतात. काल दिवसभर गोविंदबागेत गर्दी होती. पवार कुटुंबिय जमले होते, पण नेहमी उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) मात्र, नव्हते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. अखेर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चेला विराम मिळाला असून अजित पवार हे शरद पवारांच्या पाठीशी उभे असल्याचे सर्वांनी पाहिले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सुप्रिया सुळेंनी पाडव्याच्या दिवशी दुपारी पवार कुटुंबाचे फोटो पोस्ट केले होते. त्यामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिसल्या होत्या. मात्र अजित पवार नव्हते. त्यामुळे अजित पवार आता पाडव्याच्या कार्यक्रमाला येणार नाहीत असेच अंदाज वर्तवले जात होते.

कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पवार कुटुंबाची पहिलीच दिवाळी होती. या दिवाळीत अजित पवार हे शरद पवारांना गोविंदबागेत भेटणार नाहीत अशीच चर्चा रंगली होती.

याबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले होते की, अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते कुठल्याही कार्यक्रमांना गेले
नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे दादा (अजित पवार) इथे आले नसतील.
मात्र रात्री अजित पवार हे गोविंदबागेत आले. पाडवा त्यांनी पवार कुटुंबासह साजरा केला.
कारण सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोंवरुनच हे नंतर स्पष्ट झाले आहे.

सुप्रिया सुळेंनी पाडव्याच्या संध्याकाळचे जे फोटो पोस्ट केले त्या फोटोंमध्ये
अजित पवार हे शरद पवारांच्या पाठिशी उभे आहेत
असे दिसत आहे. दरम्यान, सर्व चर्चांना पूर्णविराम देत अजित पवारांनी
गोविंदबागेत पवार कुटुंबासह दिवाळी साजरी केली.

Related Posts