IMPIMP

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील ‘जेजुरी’ दौऱ्यावर, नेमकी काय भूमिका मांडणार याकडे पुरंदर तालुक्याचे लक्ष

by sachinsitapure
Maratha Reservation

पुरंदर : सरकारसत्ता ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या गुरुवारी १६ नोव्हेंबरला जेजुरीत येत आहेत. कुलदैवत खंडोबा गडावर दर्शन घेऊन जुनी जेजुरी येथे उपस्थित समाज बांधवांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. (Manoj Jarange Patil)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत नुकतीच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जेजुरीत ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले होते, तसेच सासवड या ठिकाणी सुद्धा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील जेजुरीत येत आहेत.

कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर जुनी जेजुरी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत,
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे.
आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना जरांगे पाटील जेजुरीत येत असल्याने ते नेमकी काय भूमिका मांडणार
या कडे पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Posts