IMPIMP

RTO Office Faceless Features | आता आरटीओ ऑफिसमध्ये हेलपाटे मारण्याची अन् एजंटला पैसे देण्याची नाही गरज, ‘या’ महत्वाच्या 6 सुविधा होणार फेसलेस; जाणून घ्या

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन RTO Office Faceless Features | वाहनाबाबत आणि वाहन परवाना म्हणजेच लायसन्सबाबत (License) कामे करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे नागरिक अधिक त्रस्त व्हायचे. दरम्यान आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. परिवहन विभागात वाहनाच्या आणि अनुज्ञप्तीच्या (लायसन्स) प्रत्येकी 3 अशा एकूण 6 सेवा आता फेसलेस (RTO Office Faceless Features) होणार आहेत. आरटीओच्या वतीने फेसलेस सेवेचा शुभारंभ राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या हस्ते पार पडले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरटीओच्या या निर्णयामुळे जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या वर्षभरातील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. आगोदर या सुविधा ऑनलाइन होत्या मात्र एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे. मात्र, या पुढे या सेवांसाठी आता आरटीओ कार्यालयात (RTO Office) जाण्याची आवश्यकता नसणार आहे. कारण सर्व कामे हे ऑनलाइनच्या माध्यमातून होणार आहे. (RTO Office Faceless Features)

 

आगामी काळामध्ये आरटीओ कार्यालयातील लोकांची गर्दी कमी होणार आहे. त्याचबरोबर अनेक सेवांसाठी लागणाऱ्या कठीण कागदपत्रांमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. काहीजण एजंटचा पर्याय स्वीकारतात. पण आता नागरिकांना घरबसल्या आपल्या अँड्रॉईड मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून आपली आरटीओ मधली काम करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि तो लिंक असलेला मोबाईल क्रमांक खूप आवश्यक असणार आहे. तसेच, वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक, स्थानांतर noc, पत्ता बदल, रिनिव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट लायसन्स अशा आदी कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नसणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, फेसलेस सेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र परिवहन विभागाने आता फेसलेस सुविधेवर भर दिला. त्यामध्ये एनआयसी मार्फत 6 सुविधा फेसलेस केल्या आहेत.
पुढे ही अनेक सुविधा दिल्या जातील असं परिवहन आयुक्तांकडून सांगण्यात येत आहे.
आज मुंबईत 6 फेसलेस सुविधांच परिवहन विभाग कार्यालयात (Department of Transportation Office) शुभारंभ पार पडला.

 

Web Title :- RTO Office Faceless Features | maharashtra rto office duplicate licence and other six faceless features starts from today

 

हे देखील वाचा :

ACB Trap Pune | 2000 हजाराची लाच घेताना पुणे GST कार्यालयातील महिला अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ED Action During Modi Government | मोदी सरकारच्या 8 वर्षात ED कडून किती छापेमारी?; किती बेहिशोबी संपत्ती जप्त केली?, जाणून घ्या

Latur Doctor Suicide News | दीड कोटीच्या खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या

 

Related Posts