IMPIMP

ED Action During Modi Government | मोदी सरकारच्या 8 वर्षात ED कडून किती छापेमारी?; किती बेहिशोबी संपत्ती जप्त केली?, जाणून घ्या

by nagesh
ED Inquiry | eds watch on leaders involved in scams strict action instructions

दिल्ली : वृत्तसंस्था ED Action During Modi Government | आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्वात मोठी आणि सक्रीय यंत्रणा म्हणजे सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी (ED) आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) जवळपास आठ वर्षाच्या काळात ईडीची चांगलीच चर्चा दिसून आलीय. या कालावधीत अनेकजण ईडीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या काळातच ईडीकडून (ED Action During Modi Government) अनेक जणांवर छापेमारी (Raid) करत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आयकर विभाग (Income Tax Department) आणि सीबीआय (CBI) पेक्षाही ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत. त्याचे कारण ईडीचे कडक केलेले कायदे. याच कायद्यामुळे अनेकांना कारागृहाचं तोंड पाहावे लागलं आहे. ईडीचे सध्या राज्यातील छोट्या बड्या नेते, व्यावसायिकसह देशातील बड्या नेत्यांवर जाळे पसरले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात ईडीकडून किती संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याबाबत माहिती जाणून घ्या. (ED Action During Modi Government)

 

युपीएच्या काळात ईडीच्या धाडी आणि कारवाई किती?

युपीए सरकारच्या (UPA) काळात जुलै 2005 ते मार्च 2014 पर्यंत म्हणजे 9 वर्षात 1,867 केसेस दाखल झाल्या होत्या. यूपीए सरकारमध्ये मनी लाँड्रिंग अंतर्गत (Under Money Laundering) 4,156 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच, यूपीएच्या 9 वर्षात ईडीने केवळ 112 धाडी टाकल्या होत्या.

 

मोदी सरकारच्या काळात ईडीच्या धाडी आणि कारवाई कीती?

भाजपच्या (BJP) काळात एप्रिल 2014 ते मार्च 2022 दरम्यान, 3,555 प्रकरणे नोंदवण्यात आली आणि 99,355 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. दरम्यान, ईडीच्या वार्षिक अहवालानुसार, मागील चार महिन्यांत 785 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून 7,833 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीाय. खरंतर यूपीए सरकारच्या 9 वर्षांच्या तुलनेत हा आकडा 88 टक्क्यांनी जादा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्याचबरोबर भाजपच्या 8 वर्षांच्या काळात 2,974 धाडी टाकण्यात आल्या आहेत.
यामध्ये 400 जणांना अटक केली असून 25 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे,
मार्च 2022 पर्यंत एकूण 5,422 प्रकरणे नोंदवण्यात आली असून 1.04 लाख कोटी रुपयांची
मालमत्ता जप्त (Property Confiscated) करण्यात आली आहे.

 

Web Title :- ED Action During Modi Government | action of enforcement directorate (ed) during 8 years of modi government unaccounted assets worth crores

 

हे देखील वाचा :

Latur Doctor Suicide News | दीड कोटीच्या खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यात मान्सून बरसणार ?

PFRDA New Rule | NPS मध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर ! आता होईल मोठा फायदा; नवी गाईडलाईन जारी

 

Related Posts