IMPIMP

Rupali Chakankar on Sadabhau Khot | रुपाली चाकणकरांचा सदाभाऊ खोतांवर जोरदार निशाणा; म्हणाल्या – ‘अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहिजे’

by nagesh
Rupali Chakankar on Sadabhau Khot | Rupali Chakankar Womens Commission Chairperson rupali chakankar targets sadabhau khot ketki chitale

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Chakankar on Sadabhau Khot | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तिला अटक करण्यात आली. एकिकडे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच दुसरीकडे आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी केतकी चितळेच्या पोस्टचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सदाभाऊवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक (Nashik) येथे बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ”महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात खासदार शरद पवार यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. संकटाच्या काळात राज्य सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्याकडे जनता गुरूतुल्य व्यक्तिमत्व म्हणून बघते. पण, अशा गुरूतुल्य व्यक्तीविरूद्ध वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केतकीसारख्या व्यक्ती करत असल्याचा,” आरोप चाकणकर यांनी केला आहे. तसेच, केतकीचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचाही चाकणकर यांनी समाचार घेतला. ‘समाजातील अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहीजे.’ असं त्या म्हणाल्या.

पुढे चाकणकर म्हणाल्या, ”विरोधकांनी महाराष्ट्र अशांत करण्याचा विडा उचलला आहे. सत्तेत असताना 24 तास पोलिस संरक्षणात फिरणाऱ्यांना आज विरोधात बसावे लागल्याने एकदिवसात त्यांचे पोलिसांबद्दलचे मत परिवर्तन झाले. त्या व्यक्ती महाराष्ट्र आणि पोलिसांची बदनामी करत असल्याचे,” सांगत चाकणकरांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राज्याची पोलिस यंत्रणा सक्षम असून ते चांगले काम करताहेत. त्यामुळे पोलिसांना सल्ले देण्याची गरज नसल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनता अशा विकृत मनोवृत्तीला भीक घालणार नसल्याचं,’ त्या म्हणाल्या.

Web Title :- Rupali Chakankar on Sadabhau Khot | Rupali Chakankar Womens Commission Chairperson rupali chakankar targets sadabhau khot ketki chitale

हे देखील वाचा :

Rupali Patil on Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांचं केतकीला समर्थन; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची सदाभाऊंवर टीका; म्हणाल्या…

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

Related Posts