IMPIMP

Rupali Patil on Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांचं केतकीला समर्थन; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची सदाभाऊंवर टीका; म्हणाल्या…

by nagesh
Rupali Patil on Sadabhau Khot | ncp woman leader rupali thombre patil criticized sadabhau khot in this words after reading ketki

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनRupali Patil on Sadabhau Khot | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर केतकीला अटक देखील झाली. एकीकडे केतकी चितळेवर टिकास्त्र सोडलं जात असताना दुसरीकडे भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी तिचे समर्थन केल्याचे समजते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (NCP Leader Rupali Patil) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सदाभाऊ खोत म्हणाले, ”केतकी चितळे हिचा मला अभिमान आहे. ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. न्यायालयात तिने स्वत:ची बाजु मांडली तिला मानावे लागेल,” अशा शब्दांत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे.

 

रूपाली पाटील म्हणाल्या की, ”सदाभाऊंना केतकीच्या ‘तुझं माझं जमेना’ ही मालिका आवडली असावी. सदाभाऊ शेतकरी नेते आहेत.
त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी भांडावं. असं त्या म्हणाल्या.
तसेच, ‘तुझं माझं जमेना’ ही सीरिअल नक्कीच सदाभाऊंना आवडली असेल म्हणूनच त्यांनी केतकीचे समर्थन केले.
त्यांनी तिला घरी घेऊनही जावं. पहा ! त्यांच्या वहिनी तिचं स्वागत करतात का ?’ अस त्या म्हणाल्या.

 

पुढे बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, ”राजू शेट्टी यांच्याबरोबरही त्यांचं जमलं नाही आणि सदाभाऊ त्यावर आता वेगळं काही बोललं तर आवडेल का ?”
अशा शब्दात त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Rupali Patil on Sadabhau Khot | ncp woman leader rupali thombre patil criticized sadabhau khot in this words after reading ketki

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

 

Related Posts