IMPIMP

Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडूलकर आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची विमानात झाली अचानक भेट, मास्टर ब्लास्टर रमला वीरेंद्र सेहवागच्या आठवणीत

by nagesh
sachin-tendulkar-dharmendra-sachin-tendulkar-dharmendra-meets-on-flight-master-blaster-posts-photo-by-remembering-veeru-asked-question-from-virender-sehwag

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांची अचानक विमानात भेट झाली. मात्र त्यांची ही झालेली भेट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. दोन्ही कलाकारांनी आपल्या भेटीबद्दल इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोदेखील शेअर केले आहेत. (Sachin Tendulkar-Dharmendra)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोखाली सचिन तेंडुलकरनं लिहिलं की, “आज सर्वात मोठे विरू, धर्मेंद्रजी सोबत भेट झाली! विरूची गोष्टचं वेगळी आहे, सगळे त्याचे चाहते आहेत..! काय म्हणतोस वीरू..” दरम्यान, यावर अजूनही वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

 

विरेंद्र सेहवागचे अनेक भारतीय चाहते आहेत. तसेच त्याला चाहते विरू म्हणून देखील ओळखतात. मात्र ‘शोले’ या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांचा रोल विरू असा होता. तर या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबतच अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan ), हेमा मालिनी (Hema Malini) हे कलाकार देखील होते. धर्मेंद्रचं पात्र विरू हे मात्र चांगलंच गाजलं. त्यामुळे सचिननं विरेंद्रला चिडवण्यासाठी ‘विरू’ या शब्दाचा वापर केला. (Sachin Tendulkar-Dharmendra)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

दरम्यान, सचिनच्या या शेअर केलेला पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी कमेंट केलं आहे. तसेच अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) कमेंट करून ‘ओह येस’ असं लिहिलं. तसंच अभिनेत्री ईशानं या पोस्टवर ईमोजी शेअर करून कमेंट केली आहे. तसेच या दोघांच्या झालेल्या या भेटीच्या सोशल मीडियावर तीव्र चर्चा रंगल्या आहेत. चाहते त्यांचे फोटोदेखील प्रचंड प्रमाणात व्हायरल करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये सचिन धर्मेंद्रचे पाया पडत आपला आदर व्यक्त करत आहे.

 

हे देखील वाचा :

Maharashtra Temperature | वायव्य भारतात थंडीची लाट ! पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट

Google Chrome User Update | ‘गुगल क्रोम’ केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक; 2 पिस्टल 10 काडतुसे जप्त

 

Related Posts