IMPIMP

Nagpur ACB Trap on PSI | 2 लाख रुपये लाच घेताना आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Nagpur ACB Trap on PSI | Police sub inspector of financial crime branch caught in anti corruption net while accepting bribe of Rs.2 lakh

नागपुर : सरकारसत्ता ऑनलाईन – Nagpur ACB Trap on PSI | फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यात पत्नीचे नाव न घेण्यासाठी आणि प्रॉपर्टी सिज
(Property Seizure) न करण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागून (Demanding Bribe) 2 लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) आर्थिक
गुन्हे शाखेतील (Economic Offences Wing (EOW) पोलीस उपनिरीक्षकाला नागपूर एसीबीच्या (Nagpur ACB Trap on PSI) पथकाने सापळा
रचून रंगेहात पकडले. विवेक जानरावजी लोणकर Vivek Janraoji Lonkar (वय-57 रा. देवरनकार लेआउट, वर्धा) असे लाच घेताना रंगेहात
पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नागपूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.14) केली. या कारवाईमुळे पोलीस दलात
खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत बलोदे ले आऊट अकोला येथील 34 वर्षीय व्यक्तीने नागपूर एसीबीकडे (Nagpur ACB Trap on PSI) तक्रार दिली आहे. विवेक लोणकर हे वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयातील (Wardha SP Office) आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर हिंगनघाट पोलीस ठाण्यात (Hinganghat Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर (Bail Granted) झाला असल्याने ते विवेक लोणकर यांच्याकडे हजेरीसाठी येत होते.

 

विवेक लोणकर यांनी तक्रारदार यांचा बेल रद्द न करण्यासाठी, त्यांची प्रॉपर्टी सीज न करण्यासाठी आणि
त्यांच्या पत्नीचे नाव गुन्ह्यात न टाकण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागितली. तडजोडीअंती दोन लाख
रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पडताळणी केली असता विवेक लोणकर यांनी पाच लाख रुपये लाच
मागून तडजोडीअंती दोन लाख घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना विवेक लोणकर यांना रंगेहात पकडले.
त्यांच्यावर वर्धा शहर पोलीस ठाण्यात (Wardha City Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर
(SP Rahul Maknikar), अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनामिका मिर्झापुरे (DySP Anamika Mirzapure),
पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे (Police Inspector Pravin Lakde), पोलीस निरीक्षक प्रीति शेंडे
(Police Inspector Preeti Shende), पोलीस अंमलदार सारंग बालपांडे, गिता चौधरी, आशू श्रीरामे,
अस्मिता मेश्राम, अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nagpur ACB Trap on PSI | Police sub inspector of financial crime branch caught in anti corruption net while accepting bribe of Rs.2 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, पिंपरी मधील धक्कादायक घटना

Pune News | शास्त्रीय संगीत प्रसार आणि प्रचारासाठी संगीता कुलकर्णी तर युवा पुरस्कार रुपाली काळे यांना प्रदान

Pune Crime | टिंडर अ‍ॅपवर झाली ओळख, बलात्कार करुन उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

 

Related Posts