IMPIMP

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

by nagesh
Sandipan Bhumre | 'Ambadas Demons should come and find corruption in the factory

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे गटातील मंत्रि संदीपान भुमरे  (Sandipan Bhumre) यांच्या एका वक्तव्याने त्यांच्याच गटातील मंत्रिपद न मिळालेले आमदार नाराज झाले आहेत. भुमरे म्हणाले होते की, मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे म्हणून मला पालकमंत्रीपद मिळाले. आता भुमरे (Sandipan Bhumre) यांनी यावर सारवासारव केली आहे. मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांना मंत्रिपद मिळणार की नाही हे भुमरे यांनी स्पष्टच सांगून टाकले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी सारवासारव करताना म्हटले की, हा विषय म्हणजे आम्ही सर्वच मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहोत. फक्त मी एकटा नाही. सगळ्यांना मंत्री करू शकत नाहीत किंवा पालकमंत्री बनवू शकत नाही. ज्यांना ज्यांना करता आले त्यांना मंत्री करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला.

 

भुमरे म्हणाले, आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsath) हे अजिबात नाराज नाहीत. तुम्ही दाखवता ते नाराज आहेत. शिरसाट यांनी अनेकदा सांगितले आहे की मी नाराज नाही. प्रत्येकाला पालकमंत्री आणि मंत्रिपद मिळत नाही. तसेच येणार्‍या काळात शिरसाठ यांना मंत्रिपद मिळेल की नाही? याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. हा अधिकार शिंदे साहेबांचा आहे. ते त्यांचा निर्णय घेतील.

 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या भावजींना औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम 41 टक्के कमी रकमेत देण्यात आले आहे.
यामुळे रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे होईल का? असा प्रश्न भुमरे यांना विचारला असता ते म्हणाले, या रस्त्याच्या कामासाठी ज्या निविदा काढल्या गेल्या त्या ऑनलाइन आहेत.
ना रावसाहेब दानवेंच्या हातात, ना माझ्या हातात आहे. उरला विषय 41 टक्के कमी खर्चात तर हे मला तुमच्याकडून समजले आहे.
पण आम्ही ठरल्यानुसार काम करून घेऊ. दर्जेदार काम करून घेऊ, मग कोणीही असू द्या.
रावसाहेब दानवेंचा याच्याशी काही संबंध नाही. कंत्राटदार कोणी असू द्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sandipan Bhumre | shinde faction minister sandipan bhumre reaction on sanjay shirsat

 

हे देखील वाचा :

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर

Pune Water Supply | रविवारी पुणे शहरातील ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

 

Related Posts