IMPIMP

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर

by nagesh
Subhash Desai | subhash desai replied to ashish shelar on radki sena statement andheri east bypoll

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या (Andheri By-Election) जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजपच्या उमेदवरामध्ये लढत होणार आहे. दरम्यान, आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेने आपले नाव बदलून ‘रडवी सेना’ असे नाव ठेवावे, असे शेलार म्हणाले होते. त्यावर ठाकरे गटाच्या सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. घोडा मैदान आता दूर नाही, असे सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke)यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने देखील तेथील स्थानिक नेते मुराजी पटेल (Muraji Patel) यांना लटके यांच्या विरोधात उभे केले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगला आहे.

 

आशिष शेलारांना काहीही म्हणू द्या. येत्या 3 नोव्हेंबरला मतदानाचा दिवस आहे.
त्यामुळे आता घोडामैदान फार लांब नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वच गोष्टी स्पष्ट होतील.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मैदानात येण्याचे उघड आव्हान दिले आहे. यात रडण्याचा प्रश्न येत नाही.
तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मैदानाच या, असे प्रत्युत्तर देसाईंनी (Subhash Desai)  शेलार यांना दिले आहे.

 

निवडणुकीचे मैदान असे आहे की त्यातून पळ काढता येत नाही.
एक गोष्ट मात्र निश्चित की येत्या काळात शिंदे गट आणि भाजप सोबत निवडणुका लढविणार आहे.
त्यामुळे त्यांना हरविण्यात मजा येणार आहे. आम्ही गेले 56 वर्षे निवडणुका लढवित आहोत.
त्यामुळे आमचा अनुभव दांडगा आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असे देखील देसाई यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Subhash Desai | subhash desai replied to ashish shelar on radki sena statement andheri east bypoll

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | रविवारी पुणे शहरातील ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

Pune PMC News | कात्रज ते खडीमशीन चौकातील नियोजीत रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेने हटविली परंतू भूसंपादन आणि पुर्नवसनाशिवाय रस्त्याचे काम होण्याची शक्यता कमीच

Maharashtra Congress | काँग्रेसने नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवर दाखल गुन्ह्यांचा विचारला जाब

 

Related Posts