IMPIMP

Snehlata Girish Vasaikar | घराबाहेर पडताच स्नेहलता म्हणाली – ‘यंदाच्या पर्वाचा विजेता हाच स्पर्धक असावा’

by nagesh
Snehlata Girish Vasaikar | bigg boss marathi snehalata vasaikar evicted from house says this person should win this season

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : Snehlata Girish Vasaikar | सध्या बिग बॉस मराठीचे चौथे (Bigg Boss Marathi) पर्व दिवसेंदिवस रोमांचक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना मनोरंजन करण्यात स्पर्धक कोठेही मागे राहताना दिसत नाही. आणि अशातच एका मागून एक धक्के प्रेक्षकांना मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात बिग बॉसमधून तेजस्विनी लोणारी बाहेर पडताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर समृद्धी जाधव वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथदेखील स्पर्धेबाहेर पडले, तर त्यांच्याच बरोबर डॉक्टर रोहित शिंदेदेखील बाहेर पडला, तर या आठवड्यात बिग बॉस मराठीमधून स्नेहलता वसईकर बाहेर पडली आहे. (Snehlata Girish Vasaikar)

 

तेजस्वी घराबाहेर पडताच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर घराबाहेर पडण्याआधी तिने अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांना एकत्रित मिठी मारली आणि ते दोघेदेखील भावूक झाल्याचे दिसले. जाताना स्नेहलता म्हणाली,”मी कोणाला कळत न कळत दुखावले असेल तर मला माफ करा. कारण मी समोर एक आणि मागे एक बोलत नाही. जे आहे ते समोर बोलते”. (Snehlata Girish Vasaikar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बाहेर येताच बिग बॉसच्या मंचावर स्नेहलताने महेश मांजरेकरांसोबत गप्पा मारायला सुरुवात केली. यावेळी महेश मांजरेकर यांनी तिला “इतर सदस्यांपैकी कोण या सीझनचा विनर असेल तुझ्या मते काय वाटतं” असे विचारले असता यावर स्नेहलता म्हणाली, “अक्षय मला मनापासून असं वाटतं की या सीझनचा विनर तू व्हावा. तो उत्तम खेळतोय त्यामुळे या बिग बॉसची ट्रॉफी तुझ्या हातात पाहायला मला आवडेल”. तिच्या या बोलण्याने अक्षय पुन्हा एकदा भावूक झाल्याचे दिसले. येणाऱ्या आठवड्यात नवीन काय पाहायला मिळेल? कोणाचे वाद होतील? कोण कॅप्टन बनेल? कोण सेफ होईल? तर कोण नॉमिनेट होईल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Snehlata Girish Vasaikar | bigg boss marathi snehalata vasaikar evicted from house says this person should win this season

 

हे देखील वाचा :

AUS vs SA Test Series | पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; ‘हा’ प्रमुख गोलंदाज टीममधून बाहेर

Cigarette and Tobacco | दारू विक्रीवर नवे निर्बंध? आता एकच सिगरेट मिळणार नाही, संसदीय समितीची केंद्राकडे शिफारस

Pune PMC News | ‘महापालिकेने खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या व्यायाम शाळा साहित्याचे तीन वर्षांनंतरही ऑडीट नाही’

 

Related Posts