IMPIMP

Sanjay Raut | ‘शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय निर्माण होऊ शकत नाही’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay rauts says wow the transformation of ray yogi and bhogi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना युपीए (UPA) अध्यक्ष करा अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. याच विषयावरुन अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. ‘या देशात नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पर्याय आणि विरोधपक्षांची एकजूट ही शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय होऊ शकत नाही,’ हे माझं स्पष्ट मत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ”शरद पवार हे मोठे नेते आहेत. आम्ही सगळे त्यांचा आदर सन्मान करतो.
देशातल्या विरोधीपक्षाला एका सक्षम नेतृत्त्वाची गरज आहे.
देशातल्या विरोधी पक्ष समविचारी, विरोधीपक्ष एकत्र यावा यासाठी नक्कीच काही भूमिका ठरत आहेत,
काही हालचाली ठरत आहेत आणि शरद पवार यांच्या सक्रीय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही.
हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. पवार साहेबांचं मार्गदर्शन याबाबतीत आम्हाला सर्वांना लाभत असतं.
त्यांच्या मनात काय आहे ते आम्ही जाणून घेऊ,” असं ते म्हणाले.

 

 

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ”या देशात मोदींना पर्याय आणि विरोधपक्षांची एकजूट ही शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय होऊ शकत नाही हे माझं स्पष्ट मत आहे. देशात अनेक नेते आहेत जे या एकजुटीचे नेतृत्व करू शकतील हे आम्हाला माहित आहे. पण त्यासाठी पवारांनी पुढे यावं असं आमचं मत आहे.” दरम्यान, ‘कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध, मुंबईविरुद्ध कितीही कटकारस्थाने केली तरी त्या कारस्थानांच्या छातडावर पाय रोवून आम्ही मुंबई महानगरपालिका (BMC) जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
तुम्ही कितीही षडयंत्र रचा काही फरक पडत नाही,” असं ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ‘मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका आणि या शिवाय अनेक महानगर पालिका या सगळ्या महापालिका शिवसेना ताकदिने लढेल आणि जिंकेल आणि मुंबई महानगर पालिकेवरचा भगवा झेंडा फडकवणारच.
असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut ncp sharad pawar pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट जिन्स पँटची विक्री, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune Crime | इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली 7 लाखांची फसवणूक; विचारणा केल्यावर दिली आत्महत्येची धमकी

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात कधी ऊन तर, कधी पाऊस ! आता गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts