IMPIMP

Sanjay Raut | ‘एक पुतीन दिल्लीत बसलेत जे…’; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्याशी तुलना करत केली जहरी टीका !

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on pm narendra modi russian president vladimir putin

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचं धाडसत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्रातील सरकार यांच्यामध्ये खडाजंगी सुरु आहे. या धाडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (President Vladimir Putin) यांच्याशी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आपल्या देशात युद्ध (War) नाही पण आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीमध्ये (Dehli) बसलेले आहेत. ईडी (ED), सीबीआय (CBI), आयटी (IT) या माध्यमातून बॉम्ब सोडले जात आहेत. रोज एक मिसाईल (Missile) येत आहे त्यातून आम्ही वाचलो असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार नाही त्या राज्याशी अधिक सन्मानाने वागलं पाहिजे हे आम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी शिकवलं. आपल्या विरोधात सूर लावणारे जे की आपल्या विचाराचे नाहीत त्यांना सन्मान (Respect) देणं ही खरी लोकशाही (Democracy) असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) नागपुरमधील एका कार्यक्रमात राऊत बोलत होते.

 

दरम्यान, संजय राऊत यांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला.
पुन्हा येईल वाले संध्याकाळी इथे येणार आहेत तेव्हा मीही येईल आणि बाजुला बसेल, असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on pm narendra modi russian president vladimir putin

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला थेट ऑफर; म्हणाले – ’24 तासांत निर्णय घ्या..’

Pune Police | पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! बेजबाबदार व बेशिस्तीचे गैरवर्तन केल्याचा ठपका

Pune Crime | पुण्यातील ‘एरिया 37 क्लब’वर पोलिसांचा छापा ! रमनलाल पोरवाल, सुभाष टेकवानी, किशोर जैन, राकेश कोंढेला जुगार खेळताना पकडलं; हॉटेल सुपरवायझर सुनिल मुंदडा, यतिन शहासह 6 जणांविरूध्द FIR, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts