IMPIMP

Sarkari Yojna | दर महिना होईल 10,000 रुपयांचे इन्कम, सरकार देते गॅरंटी; आतापासून द्यावे लागतील अवघे 210 रुपये महिना

by nagesh
Maharashtra Congress | Congress should ask about cases filed against Thackeray group leaders by tweeting Narendra Modi's old video

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSarkari Yojna | बहुतांश लोकांना वृद्धत्वात घरखर्च चालवण्याची चिंता असते. नियमित उत्पन्न स्त्रोत नसल्याने त्यांची उपजिविका कशी होणार याची काळजी असते. आम्ही यासाठी अशी एक सरकारी योजना सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला दरमहिना 10,000 रुपये इन्कम मिळेल. सरकारच्या या योजनेंतर्गत पती-पत्नीला पेन्शन मिळू शकते. सरकारच्या अटल पेन्शन योजनेत Atal Pension Yojana (APY) पती-पत्नी वेगवेगळी गुंतवणूक केली तर 10 हजार रूपये महिना पेन्शन मिळेल. (Sarkari Yojna)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सरकार देते रेग्युलर इन्कमची गॅरंटी

सरकार अटल पेन्शन योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर 1000 ते 5000 रूपयांपर्यंत महिना पेन्शन देण्याची गॅरंटी देते. सरकारच्या या स्कीममध्ये 40 वर्षापर्यंतच्या वयाच्या सर्व व्यक्ती अर्ज करू शकतात.

 

दरमहिना मिळतील 10,000 रूपये

योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये दर महिना एक ठराविक योगदान केल्यानंतर निवृत्तीनंतर 1000 ते 5000 रुपये मासिक पेन्शन मिळते. सरकार दर 6 महिन्यात केवळ 1239 रूपये गुंतवणूक केल्यानंतर 60 वर्षांच्या वयानंतर जिवंत असेपर्यंत 5000 रूपये महिना म्हणजे 60,000 रुपये वार्षिक पेन्शनची गॅरंटी देत आहे. पती-पत्नी दोघांनी गुंतवणूक केली तर वार्षिक 1,20,000 रुपये मिळतील. (Sarkari Yojna)

 

दरमहिना द्यावे लागतील 210 रुपये

सध्याच्या नियमानुसार, जर 18 वर्षाच्या वयात योजनेतून कमाल 5 हजार रूपये मासिक पेन्शनसाठी सहभाग घेतला तर तुम्हाला दरमहिना 210 रूपये द्यावे लागतील. जर हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रूपये आणि सहामाही दिले तर 1,239 रूपये द्यावे लागतील. महिन्यात 1,000 रूपये पेन्शन मिळवण्यासाठी जर 18 वर्षाच्या वयात गुंतवणूक केली तर मासिक 42 रूपये द्यावे लागतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कमी वयात सहभागी झाल्यास जास्त लाभ

समजा 5 हजार पेन्शनसाठी तुम्ही 35 व्या वर्षी सहभागी झालात तर 25 वर्षांपर्यंत प्रत्येक 6 महिन्यात 5,323 रूपये जमा करावे लागतील. अशावेळी तुमची एकुण गुंतवणूक 2.66 लाख रूपये होईल. ज्यावर तुम्हाला 5 हजार रूपये मासिक पेन्शन मिळेल. तर 18 वर्षाच्या वयात सहभागी झाल्यास तुमची एकुण गुंतवणूक केवळ 1.04 लाख रूपये होईल. म्हणजे एकाच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये जास्त गुंतववावे लागतील.

 

सरकारी योजनेशी संबंधीत इतर गोष्टी

पेमेंटसाठी तुमच्याकडे मंथली, तिमाही आणि सहामाही असे तीन पर्याय आहेत
इन्कम टॅक्स सेक्शन 80 सीसीडी अंतर्गत यामध्ये कर सवलत मिळते
एका सदस्याच्या नावाने केवळ एकच अकाऊंट उघडता येईल
जर 60 वर्षाच्या अगोदर किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम पत्नीला मिळेल
जर सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल

 

Web Title :-  Sarkari Yojna | sarkari yojna husband wife get regular income of rupees 10000 monthly pm narendra modi government gives gurantee

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले – ‘सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल’

Poona Merchant Chamber | नॉन ब्रान्डेड खाद्यान्न वस्तूंवर जी.एस.टी. आकारल्यास शेतकरी व ग्राहकांना फटका बसणार

Rakesh Jhunjhunwala | 5 हजार रुपयांतून उभे केले 40 हजार कोटीचे साम्राज्य, आता आकाशात टाटांसोबत स्पर्धा

 

Related Posts