IMPIMP

Service Through Ration Shops | रेशन दुकानांमध्ये नागरी सेवा, बँकिंग सुविधांसह ‘या’ सर्व गोष्टीही उपलब्ध होणार

by nagesh
Service Through Ration Shops | ration shops will now have many facilities including banking facilities

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Service Through Ration Shops | राज्यातील सुमारे 50 हजार शिधावाटप अर्थात रेशन दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांची सेवा (Service Through Ration Shops), इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सेवा (Services of India Post Payments Bank), टपाल सेवा (Postal Service), केंद्र सरकारचे संचार मंत्रालय (Union Government Ministry of Communications) व खासगी बँका (Private Banks) यांच्या सेवा आदी नागरी सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, याबाबतची माहिती राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. रेशन दुकानातील या सेवांचा लाभ शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतातील सर्वांत सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक बनण्याच्या दृष्टिकोनातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची सुरुवात केली आहे. रक्कम हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण (DBT), बिल भरणा, आरटीजीएस आदी सुविधा (Service Through Ration Shops) या बँकेतर्फे देण्यात येतात. या सेवा सुरू केल्या जात आहेत. सर्व बँकांमार्फत जाणाऱ्या सेवा शिधावाटप दुकान मार्फत दिल्या जाणार आहेत. याद्वारे शिधावाटप दुकानदारांचे उत्पन्न ((income) सुधारण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजाणीसाठी शिधावाटप (Rationing) दुकानदारांमध्ये जागृती निर्माण करून येथे शक्य असेल तेथे बँकेच्या सेवा सुरू केल्या जाणार आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

महत्त्वाचे म्हणजे रेशन दुकानांमध्ये (Ration Shops) आधारकार्ड (Aadhaar Card) दुरुस्त करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे; तसेच विविध बँकांची उत्पादने आणि सेवा या ठिकाणी उपलब्ध असतील. राज्यातील सर्व रेशन दुकानांवर स्वेच्छेने बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येईल, असे चव्हाण म्हणाले. शहरातील रेशन दुकानदारांना या दुकानांचे भाडे परवडत नाही. दुकानदारांना मिळणारे कमिशनही तुटपुंजे आहे. त्यामुळे सर्व आर्थिक स्रोत जमा करणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना (Measures) करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन व्यवस्था करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.

मोदींनी सुरू केलेल्या ‘पीएम वाणी’ उपक्रमाच्या (‘PM Vani’ initiative) माध्यमातून रेशन दुकानांमध्ये
‘पीएम वाणी’ची युनिट्स बसवण्यात येणार आहेत. याद्वारे त्या दुकानांच्या परिसरातील नागरिकांना रास्त
दरात वायफाय सुविधेचा लाभ मिळणार आहे. या बँकिंग सुविधा प्रत्यक्ष दुकानांमध्ये सुरू करण्यापूर्वी रेशनिंग
दुकानदारांना या सुविधेचा वापर करण्याबाबत संबंधित बँकेमार्फत प्रशिक्षण (Training) दिले जाणार आहे.
तसेच राज्यस्तरावर संबंधित बँकांमार्फत या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी, सुलभीकरणासाठी आणि समन्वयासाठी; तसेच जिल्हास्तरावर नोडल अधिकारी (Nodal Officer) नेमण्यात येणार आहेत.

Web Title : Service Through Ration Shops | ration shops will now have many facilities including banking facilities

Related Posts