IMPIMP

Shahu Chhatrapati | कोर्टबाजीत अर्थ नाही, आता आरक्षण मिळाले नाही तर…; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

by nagesh
Shahu Chhatrapati |  maratha reservation if not now then never warns shahu chhatrapati

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) शाहू छत्रपती यांनी अतिशय महत्वाचे विधान करत समाजासाठी इशारा दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय कोल्ड स्टोअरेजमध्ये पडला आहे. कोणत्याही कोर्टबाजीत अर्थ नाही. जे आरक्षण देतो म्हणत आहेत ते आपल्यासोबत आहेत का हे पहा. परंतू आता जर आरक्षण मिळाले नाही तर ते कधीच मिळणार नाही हे लक्षात घ्या, असेही शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक (Vasantrao Mulik) यांना चारचाकी वाहन प्रदान करण्यासाठी कोल्हापुरात एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), सतेज पाटील (Satej Patil) उपस्थित होते.

 

यावेळी शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) म्हणाले, आपण आपसात भांडत राहिलो तर मग प्रतिगामी असणार्‍या सत्तेतील शक्तीकडे लक्ष केंद्रित होते. पुरोगामित्वामध्ये जर महाराष्ट्र मागे पडला तर देशातही तसेच वातावरण होवू शकते. भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे.

 

या कार्यक्रमात आमदार जयंत आसगावकर (MLA Jayant Asgaonkar),
आमदार जयश्री जाधव (MLA Jayshree Jadhav), माजी आमदार उल्हास पवार (Former MLA Ulhas Pawar)
राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांची भाषणे झाली. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shahu Chhatrapati |  maratha reservation if not now then never warns shahu chhatrapati

 

हे देखील वाचा :

Nana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात, नाना पटोले यांचा घणाघात

CM Eknath Shinde | राज ठाकरे, वर्षा गायकवाड CM शिंदेंच्या भेटीसाठी ’वर्षा’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Eknath Khadse | भाजपा आमदाराची एकनाथ खडसेंवर टीका, पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव

Devendra Fadnavis | प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

 

Related Posts