IMPIMP

CM Eknath Shinde | राज ठाकरे, वर्षा गायकवाड CM शिंदेंच्या भेटीसाठी ’वर्षा’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

by nagesh
 CM Eknath Shinde | former education minister varsha gaikwad meets cm eknath shinde after raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सध्या विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू केल्याचे दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ’वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीडतास दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर ताबडतोब काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मुख्यमंत्र्यांना भेटल्या.

 

वर्षा गायकवाड यांनी देखील शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. शालेय शिक्षण विभागातील काही प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांची (Eknath Shinde) भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. तर राज ठाकरे आरोग्यविषयक प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कारण ठाकरे यांच्या भेटीवेळी शिंदें यांच्यासोबत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) हे सुद्धा उपस्थित होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अचानक झालेल्या ठाकरे-शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
या भेटीत आरोग्यासह राजकीय विषयावरही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East by-Election) मनसे भाजपाला (BJP) पाठींबा देणार किंवा
नाही याविषयी सुद्धा चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | former education minister varsha gaikwad meets cm eknath shinde after raj thackeray

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | भाजपा आमदाराची एकनाथ खडसेंवर टीका, पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव

Shivsena | उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, विदर्भातील ‘हा’ बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार

Devendra Fadnavis | प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil | शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची अजित पवारांची माहिती; तर जयंत पाटील म्हणाले सरकार टिकणे कठीण, चंद्रकांत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

 

Related Posts