IMPIMP

Devendra Fadnavis | प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन नक्षलवाद्यांना राष्ट्रविघातक कामात मदत केल्याचा आरोप असलेले प्रा. जी. एन. साईबाबा (Prof. G. N.
Saibaba) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने मुक्तता केली होती. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च
न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान केले होते. यावर आज सुनावणी पार पडली. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra
Fadnavis) यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शहिदांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रा. जी. एन. साईबाबा यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) दिलेला निकाल हा आज (दि. 15) सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. नागपूर खंडपीठाचा यासंदर्भात निकाल धक्कादायक आणि आश्चर्यजनक होता. समाज आणि राष्ट्रविरोधी कार्यात माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे असताना देखील, केवळ तांत्रिक मुद्यावर आरोपिला सोडून देणे चुकीचे होते. त्यामुळे आम्ही तत्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, आज न्यायालयाने निकाल दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

सर्वोच्च न्यायालयाने काल खंडपीठ गठीत करुन आज सुनावणी घेतली,
याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
जे पोलीस आणि सैनिक नक्षलवाद्यांसोबत लढताना शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा हा निकाल आहे.
सर्व पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर केवळ खटल्याच्या परवानगीचे तांत्रिक कारण सांगितले होते.
आता यावर मोठा निकाल आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | Prof. G. N. Verdict on Saibaba quashed in Supreme Court; Devendra Fadnavis’ reaction

 

हे देखील वाचा :

Shivsena | उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, विदर्भातील ‘हा’ बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार

Chandrakant Patil | शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची अजित पवारांची माहिती; तर जयंत पाटील म्हणाले सरकार टिकणे कठीण, चंद्रकांत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…

 

Related Posts