IMPIMP

Shambhuraj Desai | राष्ट्रवादी सत्तेविना तळमळत आहे पण त्यांना पुढील 15 वर्षे…, शंभुराज देसाई यांचा राष्ट्रवादीला सणसणीत टोला

by nagesh
Shambhuraj Desai | Measures to prevent accidents on Pune-Mumbai Expressway - Information by Shambhuraj Desai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सत्तेविना तळमळत आहे पण त्यांना पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही, असे शिंदे यांच्या गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी भाजप-शिंदे सरकारवर (BJP-Shinde Government) टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राष्ट्रवादीवर भाष्य केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली की लोकशाही टिकते आणि ते सत्तेतून गेले ही लोकशाही धोक्यात येते. मात्र, आम्ही लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करुन सरकार स्थापन केले आहे. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे लोकशाहीला कोणताही धोका नाही. विरोधकांनी बहुमताचा आदर केला पाहिजे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांना खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे ते सत्तेशिवाय तळमळत आहेत. त्यामुळे त्यांना अडीच नाहीतर, पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहवे लागणार आहे, असे शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले.

 

रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हंटले होते की,
राज्यात सुरु असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. यातून लोकशाही टिकणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने (Congress) पर्याय म्हणून समोर आले पाहिजे. तेव्हाच लोकशाही टिकणार आहे.

 

राज्यात शिवसेनेत (Shivsena) बंड झाल्याने महाविकास आघाडी सरकार
(Maha Vikas Aghadi Government) कोसळले. त्यातील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
आणि काँग्रेस (Congress) पक्षांना देखील या बंडाचा फटका बसला होता.
गेले तीन महिने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि शिंदे भाजप युतीचे सरकार आहे.
त्यावर महाविकास आघाडी सतत टीकांचा पाऊस पाडत आहे. हे वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत.
त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सत्ता कोण ताब्यात घेणार,
हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shambhuraj Desai | ncp is a bottom line without power but ncp will not come to power for the next 15 years shambhuraj desai on ramraje nimbalakar

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘नथुराम’च्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले, शरद पोंक्षेंनी CM शिंदेंसमोर सांगितल्या अनेक आठवणी

Deepak Kesarkar | ‘दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच…’, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

Pune Crime | दरवाजा लावायला विसरले अन् चोरट्याने साधला डाव; कर्वेनगरमधील बंगल्यातून लांबविले ८ लाखांचे दागिने

 

Related Posts