IMPIMP

Sharad Pawar | शरद पवार यांनी पुरवला नातू आमदार रोहित पवारांचा ‘हट्ट’

by nagesh
MLA Rohit Pawar | so entire maharashtra will be seen in karnataka now rohit pawar clearly said after sharad pawar on karnatak dispute

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. आपल्या मतदारसंघाचा आपल्या मनासारखा विकास व्हावा यासाठी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडेच हट्ट केला. यानंतर शरद पवार यांनी आपल्या या नातवाचा हट्ट पुरवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

श्रीगोंदा फॅक्टरी येथील नागवडे साखर कारखान्याच्या परिसरात शिवाजीराव नागवडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
या पुतळ्याचे अनावरण शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी शरद पवार म्हणाले की, श्रीगोंद्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेत राहिलेला प्रश्न आहे.
इतका की विवाहाचा आशीर्वाद देतानाही पुढारी पाण्याचा विषय काढतात. मात्र आमचे नातू आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)
यांनी बोगद्याचा प्रश्न मांडल्यानंतर इतरही नेत्यांनी त्यास पाठिंबा दिला आहे. त्यावर बैठकही झालेली आहे.
आता येत्या 3 आठवड्यात याबाबत योग्य तो निर्णय घेऊन हे दुखणे कायमचे दूर करू असे आश्वासनही शरद पवार यांनी दिले आहे.

या दरम्यान, कुकडी धरणातील अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणात पाठवण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे.
असे झाले तर या पाण्याचा लाभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या तालुक्यांना होणार आहे.
याला धरूनच रोहित पवार यांनी बोगद्याचा प्रश्न शरद पवार यांच्याकडे मांडला होता.
कुकडी धरणांमधील बोगद्यांचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्यात जर शरद पवार यांनी लक्ष घातले,
तर तो प्रश्न निकाली निघेल असे पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.
यानंतर शरद पवारांनी आमदार रोहित पवारांच्या मागणीचा उल्लेख केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Sharad Pawar | sharad pawar talk on the demand made by grandson and ncp mla rohit pawar, sharad pawar said

 

हे देखील वाचा :

Crime News | मध्यप्रदेशातील शिवसेना महिला नेत्याच्या घरात सुरु असलेल्या सेक्स रॅकटचा पर्दाफाश, महिला नेत्यासह 10 जण गजाआड

MLA Gopichand Padalkar | ‘शरद पवार अन् जयंत पाटलांकडून मला संपविण्याचा कट’ – गोपीचंद पडळकर

Devendra Fadnavis | ‘पडळकरांच्या केसाला धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

Pune Metro | हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम 7 दिवसांत सुरू करावे अन्यथा आंदोलन करणार; खासदार गिरीश बापट यांचा PMRDA ला इशारा

 

Related Posts