IMPIMP

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना झाला ‘कोरोना’, राऊत आणि पवार यांच्या भेटीमुळे ‘चिंता’

by bali123
Patra Chawl Scam | ed sent summons to sanjay rauts wife varsha raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय नेतेमंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत Varsha Raut यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब बनत असून, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. मात्र, तरीही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच आता वर्षा राऊत यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्षा राऊत Varsha Raut यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यांना ताप, सर्दी आणि खोकला झाला. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली. या टेस्टनंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांना मुंबईतील फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

दरम्यान, वर्षा राऊत Varsha Raut यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पण त्यांचे पती संजय राऊत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, तरीही त्यांना करोनाची चाचणी करावी लागणार आहे. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts